शालार्थ ID संदर्भात मोठी अपडेट; कोणाला मिळणार तात्काळ ID?

पवित्र पोर्टल मार्फत अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी अध्यापक विद्यालयांना युडायस क्रमांक नसल्यामुळे यापूर्वीच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्ष यांनी त्यांच्या ऑफलाईन पध्दतीने शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी, अशा मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

शालार्थ ID संदर्भात मोठी अपडेट; कोणाला मिळणार तात्काळ ID?

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शालार्थ आडी संदर्भात मोठी अपडेट (Shalarth ID Big updat)  समोर आली आहे. शालार्थ पोर्टल वरील सेवा समाप्त करणे, शालार्थ आयडीचे नियमन करणे, शाळेचे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात स्थलांतर झाल्यास शालार्थ प्रणालीवर बदल करण्याबाबतच्या मार्गदर्शक सुचना प्रसिद्ध (Guidelines released) करण्यात आल्या आहेत. पवित्र पोर्टल मार्फत अध्यापक विद्यालयातील नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना वेतन सुरू करण्यासाठी अध्यापक विद्यालयांना युडायस क्रमांक नसल्यामुळे यापूर्वीच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार संबंधित विभागाचे विभागीय अध्यक्ष यांनी त्यांच्या ऑफलाईन पध्दतीने शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी, अशा मार्गदर्शक सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डाॅ. महेश पालकर (Director of Education Dr. Mahesh Palkar) यांनी दिल्या आहेत.

कर्मचाऱ्याने राजीनामा दिल्यास शालार्थ आयडी बंद करुन सेवा समाप्त करणे व सदरील कर्मचारी इतरत्र रुजू झाल्यास शालार्थ आयडी चे नियमन करणे. या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याने ज्या शाळेवरुन राजीनामा दिलेला आहे. त्या शाळेच्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित कर्मचारी संबंधित विभागात अथवा इतर विभागात रुजू झाल्यास शालार्थ प्रणालीवरील सुविधा वापरुन त्याचा शालार्थ आयडी प्रथम पुनर्जिवित करावा. त्यानंतर ज्या शाळेतून राजीनामा देण्यात आलेला आहे त्या शाळेसंबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी संबंधित कर्मचाऱ्यास DETACH करावे. हा कर्मचारी ज्या शाळेत नव्याने रुजू झाला आहे त्या शाळेसंबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी या कर्मचाऱ्यास ATTACH करण्याची कार्यवाही करण्यात यावी. यापूर्वीचा शालार्थ असल्याने नव्याने शालार्थ आयडी तयार करु नये, असे सांगण्यात आले आहे.

शाळा इतर जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्यास शालार्थ प्रणालीवर करावयाच्या बदला संदर्भात एखादी शाळा त्याच जिल्ह्यात / इतर जिल्ह्यात इतर विभागातील जिल्ह्यात स्थलांतरीत झाल्यास सदरील शाळा ज्या जिल्ह्यात स्थलांतरीत झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदरील शाळेचा पूर्वीचा युडायस क्रमांक वापरुन सदरील शाळा त्यांचे विभागात स्थलांतरीत ठिकाणी प्रणालीवरील सुविधेचा उपयोग करुन पुनर्जिवित करावा व स्थलांतरीत ठिकाणी हस्तांतरीत करावा. यानंतर संबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी सदरील शाळेचे स्थलांतरीत ठिकाणी शालार्थ प्रणालीवर School Configuration करुन घ्यावे. अथवा सदरील शाळा ज्या ठिकाणी स्थलांतरीत झालेली आहे त्या विभागातील विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी नवीन युडायस क्रमांकाच्या आधारे सदरील शाळेचा समावेश संबंधित वेतन पथक अथवा गटशिक्षणाधिकारी (डीडीओ-२) यांनी सदरील शाळेचे स्थलांतरीत ठिकाणी शालार्थ प्रणालीवर School Configuration करुन घ्यावे, असे सूचना पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी प्रदान करणे संदर्भात संबंधित शाळेच्या शालार्थ प्रणालीवर पदे नमूद नसल्यास संचमान्यते प्रमाणे विभागीय शिक्षण उपसंचालक /अध्यक्ष, विभागीय शिक्षण मंडळ यांनी त्यांचेकडील प्रणालीवरील सुविधेचा वापर करुन पदे निर्माण करावीत व अशा कर्मचाऱ्यास शालार्थ आयडी देण्याची कार्यवाही करावी. दोन शाळा/शाखा/तुकडयांवर अर्धवेळ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या अर्धवेळ कार्यभाराचे वेतन शालार्थ प्रणालीतून करण्यासाठी देखील काही सूचना करण्यात आल्या आहेत.