SPPU News : विद्यापीठाचा 'अविष्कार' अन् दोन हजार रुपये एवढेच मानधन

राज्यपाल कार्यालयातर्फे या स्पर्धेला प्रोत्साहन दिले जाते. सुमारे पंधरा वर्षापासून सुरू झालेल्या अविष्कार स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

SPPU News : विद्यापीठाचा 'अविष्कार' अन् दोन हजार रुपये एवढेच मानधन
SPPU News

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 

विद्यार्थ्यांना संशोधनाची (Research) गोडी लागावी, या उद्देशाने आयोजित केल्या जाणाऱ्या अविष्कार स्पर्धेसाठी (Avishkar Competition) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (SPPU) प्रत्येक महाविद्यालय व संशोधन संस्थेला दोन हजार रुपये एवढे मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी येत्या २५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. संशोधन स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या महाविद्यालयांना मानधन दिले जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

राज्यपाल कार्यालयातर्फे या स्पर्धेला प्रोत्साहन दिले जाते. सुमारे पंधरा वर्षापासून सुरू झालेल्या अविष्कार स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे विद्यापीठाने या स्पर्धेत अनेक वेळा प्रथम क्रमांक पटकावला आहे. विद्यार्थ्यांमधून उद्योजक व संशोधक निर्माण व्हावे, या उद्देशाने विद्यापीठातर्फे विविध उपक्रम राबवले जातात. त्यामुळेच संशोधन क्षेत्रात विद्यार्थी आघाडीवर आहेत.

‘मेरी माटी मेरा देश’च्या जागतिक विक्रमासाठी महाविद्यालयांवर मोठी जबाबदारी

 

अविष्कार स्पर्धेच्या कार्यपद्धतीची नियमावली निश्चित करण्यासाठी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशीनुसार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना एक मिनिटांची व्हिडिओ क्लिप तयार करावी लागणार आहे. तसेच पोस्टर आणि शंभर शब्दांत प्रकल्पाची माहिती द्यावी लागणार आहे. येत्या ३० सप्टेंबर पर्यंत विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाकडे ही माहिती सादर करणे आवश्यक आहे. दि. २५ सप्टेंबरपर्यंत संशोधन स्पर्धा आयोजित केल्याची माहिती देणाऱ्या महाविद्यालयांनाच दोन हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

 

यावर्षी नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारात मुख्य अविष्कार स्पर्धा होणार आहे. तत्पूर्वी विद्यापीठाची संलग्न महाविद्यालयांनी आपापल्या महाविद्यालय स्तरावर स्पर्धेचे आयोजन करावे लागणार आहे. तसेच याबाबत कार्यशाळा घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान विभाग स्तरावरील स्पर्धा होणार आहे. 

 

विभाग स्तरावरून निवडण्यात आलेल्या स्पर्धकांना जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी आणि त्यानंतर गटनिहाय अंतिम स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत. ह्युमिनीटीज लॅंग्वेज अँड फाईन आर्ट, कॉमर्स मॅनेजमेंट अँड लॉ, प्युअर सायन्स, ॲग्रीकल्चर अँड  ॲनिमल हसबंड्री, इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी, मेडिकल अँड फार्मसी या विभागातील संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांना सादर करावयाचे आहेत.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j