सेट परीक्षेचा निकाल जून अखेरीस; मराठा आरक्षणावर मंत्रायलाकडून मिळेना उत्तर 

सेट परीक्षेचा निकाल जाहीर करताना शैक्षणिक आरक्षणाचा नियम पाळावा की नोकरीसाठी दिलेल्या आरक्षणाचा नियम पाळावा,याबाबत असंभ्रम आहे.

सेट परीक्षेचा निकाल जून अखेरीस; मराठा आरक्षणावर मंत्रायलाकडून मिळेना उत्तर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे (Set Department of Savitribai Phule Pune University) सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी ७ एप्रिल 2024 रोजी घेण्यात आलेल्या सेट परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा (Awaiting Set Exam Result) हजारो उमेदवार करत आहेत. मात्र, निकाल जाहीर करण्यासाठी मराठा आरक्षण (maratha reservation) लागू करावे की नाही, याबाबत मंत्रालयाकडून अद्याप सेट विभागाला उत्तर प्राप्त झाlले नाही.परंतु, येत्या आठवड्याभरात त्यावर लेखी उत्तर मिळण्याची शक्यता आहे.त्यामुळे जून महिना अखेरीस (end of June) किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सेट परीक्षेचा निकाल (SET EXAMINATION RESULT)जाहीर केला जाऊ शकतो,असे सेट विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. 

महाराष्ट्र व गोवा राज्यातील प्रमुख 17 शहरांमधील 298 परीक्षा केंद्रांवर (exam centers) आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी यंदा 1 लाख 28 हजार 243 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.त्यातील 1 लाख 9 हजार 154 विद्यार्थी परीक्षेस उपस्थिती होते. तर 19 हजार 89 विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले.उपस्थितीची आकडेवारी विचारात घेता 85.11 टक्के विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते.आत्तापर्यंतच्या परीक्षांची विद्यार्थ्यांची उपस्थिती विचारात घेता ही आकडेवारी सर्वाधिक होती.परीक्षा दिलेले उमेदवार आता निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र, निकाल केव्हा जाहीर होणार याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. 

सेट परीक्षेचा निकाल जाहीर करताना त्यात मराठा आरक्षणाचा विचार करावा,अशी मागणी काही विद्यार्थ्यानी सेट विभागाकडे केली होती.त्यावर सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी मराठा आरक्षण लागू करावे किंवा नाही,याबाबत विद्यापीठ प्रशासनाने शासनाला पत्रव्यवहार केला आहे.तसेच विद्यापीठाचे अधिकारी दोन वेळा  प्रत्यक्षात मंत्रालयात जाऊन आले आहेत. परंतु, अद्याप शासनाकडून त्यावर कोणतेही उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे सेट परीक्षेचा निकाल जाहीर करताना शैक्षणिक आरक्षणाचा नियम पाळावा की नोकरीसाठी दिलेल्या आरक्षणाचा नियम पाळावा,याबाबत असंभ्रम आहे.परंतु, लवकरच हा संभ्रम दूर होईल, असे विद्यापीठातील अधिकारी सांगत आहेत.