पुन्हा त्याच घोटाळेबाज TCS आणि IBPS कंपन्यांची निवड ; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची नाराजी 

अशा कंपन्यांची पुन्हा निवड केल्याने लाखो उमेदवारांचे नुकसान होणार हे निश्चित आहे.

पुन्हा त्याच घोटाळेबाज TCS आणि IBPS कंपन्यांची निवड ; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची नाराजी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरकारने सरळसेवा परीक्षा (Service Exam) घेण्यासाठी TCS आणि IBPS कंपन्यांची निवड केली आहे. त्यांनी आता पर्यंत बऱ्याच विभागाच्या परीक्षा घेतल्या आहेत. प्रत्येक परीक्षांमध्ये घोटाळा झाला आहे. त्याच बरोबर या कंपन्यांचे कर्मचारी सुध्दा घोटाळ्यामध्ये सहभागी होते. बरेच सेंटर मॅनेज होते तसेच त्या त्या  विभागाचे काही अधिकारी सुद्धा यात सहभागी असल्याचे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे अशा कंपन्यांची पुन्हा निवड केल्याने लाखो उमेदवारांचे नुकसान होणार हे निश्चित आहे, त्यामुळे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) नाराजी व्यक्त केली आहे. 

लातूर येथील गुरू ऑनलाईन सेंटर तलाठी परीक्षा वेळी आम्ही दिलेल्या पुरावे आधारे ते पकडले गेले. त्या सेंटर वर फक्त तलाठी मध्येच घोळ नाही झाला तर त्या सेंटर वर झालेल्या सर्व विभागाच्या परीक्षा मध्ये यांनी घोळ केला आहे. त्यामुळे फक्त तलाठीची चौकशी होऊन उपयोग नाही तर सर्व विभागाच्या परीक्षांची चौकशी ही झाली पाहिजे.

एमपीएससी सारखी विश्वासहार्य संस्था असताना राज्य सरकार या परीक्षा अन्य कंपन्याकडे का सोपवत आहे ? असे प्रश्न यानिमित्ताने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या उमेदवारांना पडले आहेत. या कंपन्यांनी घेतलेल्या आरोग्य सेवा, तलाठी भरती, पोलीस भरती यांसारख्या सर्वच सरळसेवा भरती परीक्षाचे पेपर फुटले आहेत किंवा गैरप्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे एका परीतक्षेत झालेल्या गैरप्रकरणाची चौकशी होऊन काहीच उपयोग नाही, त्यासाठी सर्व विभागांच्या परीक्षेची चौकशी झाली पाहीजे, अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने एक्स या समाज माध्यमांद्वारे केली आहे.