NATA 2024 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

NATA 2024 ची परीक्षा 6 एप्रिल रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे.

NATA 2024 परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा (NATA) 2024 साठी  कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने नोंदणी प्रक्रिया (Registration process) सुरू केली आहे.  इच्छुक आणि पात्र उमेदवार www.nata.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. 

NATA 2024 ची परीक्षा येत्या 6 एप्रिल रोजी होणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात घेतली जाणार आहे. पहिले सत्र सकाळी 10.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत असेल, तर दुसरे सत्र दुपारी 1.30 ते 4.30 या वेळेत होईल.

NATA परीक्षा एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीत सर्व शनिवार आणि रविवारी दोन सत्रात घेतली जाईल. या NATA परीक्षेचे गुण 2 शैक्षणिक वर्षांच्या कालावधीसाठी वैध असतील.

अर्ज भरताना, उमेदवारांना त्यांचे तपशील आणि शैक्षणिक पात्रता प्रविष्ट करावी लागेल. या व्यतिरिक्त उमेदवारांना त्यांचे नवीन फोटो अपलोड करावे लागतील. उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी  jpg/jpeg मोडमध्ये असावी.