विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचा रविवारी उद्घाटन समारंभ

‘विद्यार्थी सुविधा केंद्रा’मुळे सवा लाख विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार  

विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचा रविवारी उद्घाटन समारंभ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपक्रेंद्राच्या नूतन इमारतीचे उद्धाटन येत्या रविवारी (दि. ३ ) होणार आहे. अहमदनगर येथील बाबुर्डी घुमट येथे बांधण्यात आलेल्या या इमारतीचे उद्धाटन महसूल पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाअध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.(डॉ) सुरेश गोसावी उपस्थित राहणार असून खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्र - कुलगुरू प्रा.(डॉ) पराग काळकर, आमदार संग्राम जगताप, आमदार  निलेश लंके, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील, अहमदनगर उपकेंद्राचे संचालक डॉ. नंदकुमार सोमवंशी आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.  

तब्बल १८,००० स्के. फु. जागेवर बांधण्या आलेल्या या नूतन इमारतीमुळे जिल्याह्यातील सवा लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. या ठिकाणी ‘विद्यार्थी सुविधा केंद्रा’ची निर्मिती करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना आता विविध शैक्षणिक कामासाठी पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये येण्याची गरज नाही. या कक्षामार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, विविध प्रमाणपत्रांचे अर्ज स्विकारणे, परीक्षेच्या निकाल पत्रातील दुरूस्ती संदर्भात अर्ज स्विकारणे, सुधारीत निकाल पत्र देणे तसेच विद्यापीठात असणाऱ्या विविध शैक्षणिक कार्सेसची माहिती या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत दिली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी सॉफ्ट स्कील्स सारखे प्रशिक्षणाचे कार्यक्रमही याठिकाणी राबविण्यात येणार आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२४- २५ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहमदनगर उपकेंद्र व उच्च तंत्रज्ञान विभाग, महाराष्ट्र शासन यांचेतर्फे १००० विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचे प्रशिक्षण देऊन प्लेसमेंट करणार आहेत. यासह विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु करण्यात येणार असुन त्यासाठी प्रत्येकी ३० कोटींचे नियोजन आहे.

उपकेंद्राच्या उद्घाटनांच्या  कार्यक्रामास व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. संदीप पालवे, रविंद्र शिंगणापूरकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे,  प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. धोंडीराम पवार,  श्रीमती बागेश्री मंठाळकर, श्री. सागर वैद्य, प्रा. डॉ. संगीता जगताप, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे,  प्रा. डॉ. सुदर्शन कुमार, अहमदनगर उपकेंद्र समिती सदस्य  अमित कोल्हे,  डॉ. राजधर टेमकर, डॉ. जयश्री सिनगर, अधिसभा सदस्य डॉ. प्रदीप दिघे, डॉ. बाळासाहेब सागडे,  डॉ. युवराज नरवडे,  सचिन गोर्डे पाटील, अमोल घोलप, बाबुर्डी घुमटच्या सरपंच  नमिता पंचमुख, उपसरपंच  ज्योती परभाणे आदी उपस्थित राहणार आहेत.