तलाठी परीक्षेत 200 प्लस मार्क मिळालेले एकाच गावचे; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा नवा आरोप

लातूर मधील एका सेंटर चालकाच्या जवळचे नातेवाईक आहेत. शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते.किती हा योगायोग आहे.

तलाठी परीक्षेत 200 प्लस मार्क मिळालेले  एकाच गावचे; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा नवा आरोप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

"लातूर मधील तलाठी घोटाळ्याबाबत (talathi bharti )धक्कादायक गोष्टी समोर येत आहे.काही जिल्ह्यातील टॉपर मुले ज्यांना 200 प्लस मार्क आहेत ते एकाच गावचे आहेत शिवाय ते लातूर मधील एका सेंटर चालकाच्या जवळचे नातेवाईक आहेत. शिवाय हे टॉपर त्याच सेंटर वर वनरक्षक भरती पर्यंत कामाला होते.किती हा योगायोग आहे. यांचा आणि अभ्यासाचा काडी मात्र संबंध नाहीये. तरी यांना 200 प्लस मार्क आहेत आणि अभ्यास करणारे विद्यार्थी वेडे आहेत लायब्ररी मध्ये अभ्यास करत बसतात आणि वेडी आशा करतात की आम्हाला सरळसेवा मधून नोकरी मिळेल " ,असे ट्विट स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने (Competitive Examination Coordination Committee) करत पुन्हा एकदा तलाठी भरातीमध्ये घोटाळा झाला असल्याचा दावा केला आहे.
 
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे तलाठी भरतीत झालेल्या घोटाळ्याबाबत निवेदन दिले आहे.त्याचाप्रमाणे टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांना पास केल्याचेही आरोप केले होते. तसेच याबाबत चौकशी करण्याचे आव्हानही शासनाला केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्विट करून स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने नवी माहिती समोर आणली आहे.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या म्हणण्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात असे प्रकार झाले आहेत. हे फक्त उदाहरण आहेत. जर लातूर मधील सेंटरची न्यायालयीन SIT मार्फत चौकशी केली तर सर्व सत्य समोर येईल.  पण यात सर्व जण सहभागी आहेत,अशी शंका आहे. कारण बाकीचे बरेच जण ज्यांनी लातूर सेंटर वरून परीक्षा दिली आहे आणि मार्क जास्त आहेत त्यांचे घरचे उच्च स्तरीय सरकारी अधिकारी आहे.सब सर्व मिली भगत आहे. गरिबांच्या होतकरू मुलांनी फक्त अभ्यासच करायचा का? मायबाप सरकार डोळे उघडा आणि चौकशी करा?  सत्य समोर येईल. जे वनरक्षक पर्यंत त्याच सेंटर वर जॉब करत होते तिथेच तलाठीच सेंटर आला आणि त्यांना 200 प्लस मार्क मिळाले. किती भारी आहे ना हे,असेही या ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.