विद्युत विभागात अडीच हजार जागांवर भरती; पदे, अर्ज कसा भरायचा...संपूर्ण माहिती वाचा...

महाट्रान्स्कोमध्ये एकूण २ हजार ५४१ पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे वरिष्ठ तंत्रज्ञान, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २ (ट्रान्समिशन सिस्टम), विद्युत सहायक (ट्रान्समिशन) (कंत्राटी) आहेत.

विद्युत विभागात अडीच हजार जागांवर भरती; पदे, अर्ज कसा भरायचा...संपूर्ण माहिती वाचा...
Mahatransco Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने (Mahatransco) तब्बल अडीच हजारांहून अधिक पदभरतीसाठी (Recruitment) जाहिरात काढली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छूक उमेदवारांना १० डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विद्युत सहायक या पदाच्या सर्वाधिक १ हजार ९०३ जागांवर भरती केली जाणार आहे. (Maharashtra Government)

 

महाट्रान्स्कोमध्ये एकूण २ हजार ५४१ पदांची भरती केली जाणार आहे. ही पदे वरिष्ठ तंत्रज्ञान, तंत्रज्ञ १, तंत्रज्ञ २ (ट्रान्समिशन सिस्टम), विद्युत सहायक (ट्रान्समिशन) (कंत्राटी) आहेत. यासाठी www.mahatransco.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर आहे. या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षेद्वारे केली जाईल. परीक्षेची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यानंतर मुलाखत फेरी, डीव्ही राऊंड आणि मेडिकल होईल. 

‘त्या’ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत शुल्क माफी! महाविद्यालये उदासीन

 

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून संबंधित विषयातील ITEI डिप्लोमा, BE, B.Tech, PG इत्यादी पदवी असणे आवश्यक आहे. काही पदांसाठी, १० वी उत्तीर्ण देखील अर्ज करण्यास पात्र  आहेत. या पदांसाठी  १८ ते २८ वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. 

 

विद्युत सहायक ही पदे तीन वर्षांसाठी कंत्राटी पध्दतीने भरली जाणार आहेत. हा कालावधी समाधानकारकरित्या पूर्ण केल्यानंतर अनुशेष आणि रिक्त पदे यांचा विचार करून, कंपनीची गरज विचारात घेऊन व कंपनीच्या नियमांच्या अधीन राहून संबंधित उमेदवारांना नियमित पदावर सामावून घेण्याबाबतचा निर्णय प्रशासन घेईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

 

रिक्त जागा तपशील 

एकूण पदे – २,५४१

वरिष्ठ तंत्रज्ञ – १२१

तंत्रज्ञ १ – २००

तंत्रज्ञ २ – ३१४

विद्युत सहायक (कंत्राटी) – १,९०३ 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO