Pune News : स्पर्धा परीक्षेत अपयश आले अन् वेळीच बदलला ट्रॅक; 'प्लॅन बी'मुळे योगेश बनला उद्योजक

कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना पाळीच्या दिवसात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची जाणीव योगेशला पुण्यात आल्यानंतर प्रकर्षाने झाली.

Pune News : स्पर्धा परीक्षेत अपयश आले अन् वेळीच बदलला ट्रॅक; 'प्लॅन बी'मुळे योगेश बनला उद्योजक
Yogesh Kawade

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

Pune News : पुण्यात स्पर्धा परीक्षेची (Competitive Examination) तयारी करण्यासाठी राज्यातून कित्येक तरुण येत असतात. कित्येकांना स्पर्धा परीक्षेत यश येत नाही, मग पुन्हा पुन्हा परीक्षा द्यायच्या, हा एकच ध्यास या युवकांसमोर असतो. या सर्व प्रक्रियेत वय मात्र निघून जाते. परिणामी, विद्यार्थ्यांना (Students) बऱ्याचदा निराशा येते. घरची आर्थिक परिस्थिती, ना नोकरी (Job), ना यश...मग सुरू होते जगण्याची लढाई. अशा युवकांसाठी योगेश कवाडे (Yogesh Kawade) हा युवक प्रेरणादायी आहे. (Plan B for competitive Examination)

योगेश स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुण्यात आला आणि परीक्षेसाठी जोरदार तयारीही सुरु केली. पण भविष्यात मात्र वेगळेच घडणार होते. कामानिमित्त किंवा शिक्षणासाठी घराबाहेर पडणाऱ्या महिलांना पाळीच्या दिवसात कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते याची जाणीव त्याला पुण्यात आल्या नंतर प्रकर्षाने झाली. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या योगेशच्या मनात महिलांसाठी काही करता येईल का, असा विचार सुरु झाला.

Education Loan : वैद्यकीय, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज घ्या... राज्य सरकार भरेल व्याज!

दोन वर्ष स्पर्धा परीक्षा दिल्यानंतर त्यात यश आले नाही आणि योगेशने 'प्लॅन बी' वर काम करायला सुरुवात केली. त्याच्या या प्रवासाबद्दल ‘एज्युवार्ता’शी बोलताना योगेश म्हणाला, मी मूळचा उस्मानाबादचा तिथेच १२ वी  पर्यंत माझे शिक्षण झाले. लहानपणीच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे माझी आणि माझ्या दोन मोठ्या बहिणींची जबाबदारी आईवर आली होती. आईला लहानपणापासून कुटुंबासाठी कष्ट घेताना पाहत होतो. पुढचे शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा देण्याची इच्छा मनात घेऊन पुण्यात आलो. पुण्यात ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

एकीकडे आईला हातभार लावायचा होता, त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे कोचिंग करून पैसे कमवत होतो. स्पर्धा परीक्षांची पण तयारी सुरु होती. पुण्यात आल्यावर पाळीच्या दिवसात घराबाहेर पडणाऱ्या महिलांची अडचण प्रकर्षाने जाणवली. बऱ्याच महिलांजवळ ऐनवेळेस सॅनिटरी पॅड्स उपलब्ध नसल्यामुळे त्यांची उडणारी धांदल, वापरलेल्या पॅडची योग्य विल्हेवाट लावू शकत नसल्यामुळे सार्वजनिक स्वछता गृहात, डस्टबिन, कचरा कुंड्या अशा कुठेही त्या पॅड फेकल्या जात होत्या. यामुळे मी जरासा विचलित झालो होतो. यावर काहीतरी उपाय काढावा असे वाटायचे. त्यातच मला स्पर्धा परीक्षेत यश येत नव्हते, असे योगेशने सांगितले.

नायब तहसीलदारपदी निवड झालेले अनिल पाटील आणि जयश्री नाईक यांचा खेळाडूचा दावा खोटा; MPSC कडून शिफारस रद्द

अपयशामुळे खचून न जाता योगेशने दुसरा पर्याय शोधायचा ठरवले. ‘प्लॅन ए’ सक्सेस झाला नव्हता. त्यामुळे ‘प्लॅन बी’ वर काम सुरू केले. योगेशने त्याच्या काही मित्रांसोबत मिळून ' सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन' विकसित केले. या मध्ये कॉईन टाकले कि पॅड्स बाहेर येत होते. तसेच या मशीनमध्ये वापरलेल्या पॅड टाकल्या तर त्याची योग्य विल्हेवाटही लावता येत होती. या मशीनमुळे योगेशचे नशीब पालटले. स्पर्धा परीक्षा देण्यासाठी पुण्यात आलेला योगेश आता उद्योजक बनला. त्याचा व्यवसायाला पुण्यातच भरभराट आली आहे.

योगेशने तयार केलेली 'सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन' मोठमोठ्या कंपंन्यामध्ये, पंचतारांकित हॉटेल्समध्ये, रिसॉर्ट, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी बसवली आहे. काही शासकीय कार्यालयांमध्येही ही मशीन बसवण्यात आली. विशेष म्हणजे राज्याबाहेर मेघालय, नागालँड, मिजोराम, झारखंड या राज्यांमध्येही या मशीन मागवण्यात आल्या. त्याच्या या यशाचे गमक सांगताना योगेश सांगत होता, "स्पर्धा परीक्षेत यश मिळत नव्हते म्हणून खचून न जाता मी दुसरा पर्याय शोधला. माझी समाजासाठी काही तरी करण्याची तळमळ यातून पूर्ण होणार होती. प्रामाणिकपणे प्रयत्न केले, माझे १०० टक्के दिले आणि मला यश गवसले होते."

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo