Apna Chandrayaan : खास शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाने आणले ‘अपना चंद्रयान’

धर्मेंद्र प्रधान यांनी चंद्रयान-३ वर आधारित १० विशेष मॉड्यूल्स देखील जारी केले आहेत. हे मोड्यूल्स देशभरातील शाळांमधून शिकवले जातील, पण हे मोड्यूल्स विद्यार्थ्यांसाठी पर्यायी असतील.

Apna Chandrayaan : खास शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाने आणले ‘अपना चंद्रयान’

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

चंद्र मोहिम (Chandrayaan-3) आणि त्याच्या विविध पैलूंविषयी  विद्यार्थ्यांना (Students) अधिकाधिक माहिती व्हावी, त्यांना विज्ञान-तंत्रज्ञान (Science and Technology) या विषयी अधिक गोडी निर्माण व्हावी, या हेतूने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या (Education Ministry) वतीने खास शालेय विद्यार्थ्यांसाठी 'अपना चंद्रयान' (Apna Chandrayaan) हे वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि इस्रोचे अध्यक्ष डॉ. श्रीधर पणिक्कर सोमनाथ यांच्या हस्ते  या वेबपोर्टलचे उदघाटन करण्यात आले. 

 

धर्मेंद्र प्रधान यांनी चंद्रयान-३ वर आधारित १० विशेष मॉड्यूल्स देखील जारी केले आहेत. हे मोड्यूल्स देशभरातील शाळांमधून शिकवले जातील, पण हे मोड्यूल्स विद्यार्थ्यांसाठी पर्यायी असतील. हे सर्व मॉड्यूल चंद्र मोहिमेच्या विविध पैलूंचे प्रतिनिधित्व करतात. यात शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, कोडी आदींचा समावेश करण्यात आला आहे.  याशिवाय वेबपोर्टलमध्ये ऑर्बिटल स्पेस स्टेशनची स्थापना, पुढच्या पिढीच्या प्रक्षेपण वाहनांचा विकास इत्यादींचा समावेश आहे. 

‘एनडीए’तील कॅडेट प्रथम महाले याचा मृत्यू; बॉक्सिंग खेळताना डोक्याला दुखापत

 

हे वेबपोर्टल आणि मॉड्यूल्स NCERT ने विकसित केले आहेत. कार्यक्रमात एनसीईआरटी निर्मित चंद्रयान-३ चा प्रवास दर्शविणारी लघुपटही दाखविण्यात आला. कार्यक्रमात केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थीही सहभागी झाले होते. काही विद्यार्थ्यांनी चंद्रयान-3 वर आधारित कवितांचे वाचन  केले. 

 

भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चांद्रयान-३ मोहीम पूर्ण केली असल्याचे इस्रोचे अध्यक्ष डॉ. सोमनाथ यांनी सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांना २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता गगनयान प्रक्षेपण पाहण्याचे आवाहन केले. 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k