सीएपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठा निर्णय : परीक्षा आता मराठीतून देता येणार

आसामी, बंगाली , गुजराती , मराठी, मल्याळम, कन्नड ,तमिल ,तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी या भाषांचा समावेश केला आहे. येत्या १ जानेवारी २०२४ पासून या पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.

सीएपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी मोठा निर्णय : परीक्षा आता मराठीतून देता येणार

एज्युवार्ता न्यून नेटवर्क

केंद्रीय गृह मंत्रालयाने सशस्त्र पोलीस दलातील भरतीसाठी CAPF (सीएपीएफ) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी ) GD परीक्षेसाठी आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त मराठीसह इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देता येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकाराने सीएपीएफमध्ये स्थानिक तरुणांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

     या निर्णयामुळे लाखो उमेदवार त्यांच्या मातृभाषेत परीक्षेत देता येईल, परिणामी या तरुणांची या भरातीत निवड होण्याची शक्यता वाढणार आहे. गृह मंत्रालय आणि कर्मचारी निवड आयोग यांच्यात याबाबत सामंजस्य करार झाला असून आता विविध भारतीय भाषांमध्ये परीक्षा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यात आसामी, बंगाली , गुजराती , मराठी, मल्याळम, कन्नड ,तमिल ,तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी, कोकणी या भाषांचा समावेश केला आहे. येत्या १ जानेवारी २०२४ पासून या पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.

      कॉन्स्टेबल जीडी ही स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे आयोजित केलेल्या फ्लॅगशिप परीक्षांपैकी एक आहे. देशभरातील लाखो उमेदवार ही परीक्षा देण्यास उत्सूक असतात. आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये ही परीक्षा घेतली जाईल. स्थानिक तरुणांना त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधीचा उपलब्ध करून देत तरूणांना देशाची सेवा करण्यासाठी आणि त्यांचे करिअर घडविण्यासाठी राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारांनी व्यापक मोहीम सुरू करणे अपेक्षित आहे.त्याचाच हा एक भाग आहे.