CBSE बोर्ड परीक्षेच्या निकालात बदल ; आता ओवरऑल डिवीजन / डिस्टिंक्शन नाही

२०२४ च्या परीक्षांमध्ये  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही ओवरऑल डिवीजन किंवा डिस्टिंक्शन देणार नाही. सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली आहे.

CBSE बोर्ड परीक्षेच्या निकालात बदल ; आता ओवरऑल डिवीजन / डिस्टिंक्शन नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 CBSE BOARD केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - (सीबीएसई) बोर्डाने इयत्ता दहावी  आणि बारावीच्या परीक्षांबाबत महत्त्वाची सूचना (Important information regarding 10th and 12th examinations) प्रसिध्द केली आहे. त्यानुसार २०२४ च्या परीक्षांमध्ये  दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही ओवरऑल डिवीजन किंवा डिस्टिंक्शन (Overall Division or Distinction) देणार नाही. सीबीएसई बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज (CBSE Board Exam Controller Sanyam Bhardwaj) यांनी ही माहिती दिली आहे. तसेच बोर्डाच्या पोर्टलवरही याविषयी स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा : JEE Advanced 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

सीबीएसईने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकानुसार बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुण मोजण्याचे निकष काय असावेत, यासंदर्भात सीबीएसई बोर्डाकडे अनेकांनी पत्रव्यवहार केला होता. या पार्श्वभूमीवर परीक्षेसंदर्भातील नियमावलीचा अभ्यासक करून विद्यार्थ्यांना कोणतीही डिव्हिजन / किंवा डिस्टिंक्शन दिले जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे . 

सीबीएसईच्या इयत्ता दहावी  आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारीमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत. येत्या १५ फेब्रुवारी २०२४ पासून परीक्षा सुरू होणार असून त्या  एप्रिलपर्यंत चालणार आहेत. त्यासाठीचे डेटशीट लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, यासंदर्भात बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. बोर्डाकडून या महिन्यात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर जाण्याची शक्यता आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करताना अडचण येणार नाही.