NCERT च्या पुस्तकांमध्ये रामायण, महाभारताचा समावेश होणार

पॅनेलच्या शिफारशीनुसार, इतिहासाचे प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, ब्रिटीश काळ आणि आधुनिक भारत या चार भागांमध्ये विभागणी केली जाईल.

NCERT च्या पुस्तकांमध्ये रामायण, महाभारताचा समावेश होणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (NCERT) गेल्या काही महिन्यांत शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये (School Books) मोठे बदल केले आहेत. या मालिकेत ‘एनसीईआरटी’च्या सात सदस्यांच्या समितीने आणखी एका बदलाची शिफारस केली आहे. NCERT  पॅनलने रामायण (Ramayana) आणि महाभारत (Mahanharata) शाळांमध्ये शिकवण्याची शिफारस केली आहे.

 

समितीचे अध्यक्ष सीआय इसाक या विषयी माहिती देताना म्हणाले की, पॅनेलने NCERT अभ्यासक्रमात बदल करण्याची शिफारस केली आहे. शाळेच्या वर्गखोल्यांच्या भिंतींवर राज्यघटनेची प्रस्तावना स्थानिक भाषांमध्ये लिहावी, असेही  पॅनेलने म्हटले आहे. याशिवाय, पॅनेलने इतिहासाचे चार कालखंडात वर्गीकरण करण्याची शिफारस केली आहे. 

गट शिक्षण अधिकाऱ्यालाच नोटीस ; अनधिकृत शाळांची यादी केली होती प्रसिध्द

 

इसाक म्हणाले की, "सामाजिक शास्त्र अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत यांसारख्या कथांचा समावेश केल्याने विद्यार्थ्यांचा आत्मसन्मान, देशभक्ती आणि त्यांच्या देशाबद्दलचा अभिमान त्यांच्या किशोरावस्थेत वाढू शकतो."  याशिवाय,  पॅनेलने इतिहासाचे चार कालखंडात वर्गीकरण करण्याची शिफारस केली आहे. आतापर्यंत पुस्तकात इतिहास तीन भागात शिकवला जात होता. यामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत विभागांचा समावेश आहे.

 

पॅनेलच्या शिफारशीनुसार, इतिहासाचे प्राचीन काळ, मध्ययुगीन काळ, ब्रिटीश काळ आणि आधुनिक भारत या चार भागांमध्ये विभागणी केली जाईल. शाळांमध्ये शिकवल्या जाणाऱ्या सामाजिक शास्त्राच्या अभ्यासक्रमात सुधारणा करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या NCERT च्या सामाजिक शास्त्र समितीने पुस्तकांमध्ये भारतीय ज्ञान प्रणाली, वेद आणि आयुर्वेद यांचा समावेश करण्याविषयी सांगितले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO