कौशल्य शिक्षण स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपयुक्त

विद्यार्थ्यांचे कौशल्य गुण विकसित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहेत.

कौशल्य शिक्षण स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपयुक्त

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत new education policy-NEP डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या Deccan education society (डीईएस) DES माध्यमिक शाळांमध्ये secondary school या वर्षीपासून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जात असून विद्यार्थ्यांचे कौशल्य skill गुण विकसित करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे अभ्यासक्रम उपयुक्त ठरणार आहेत,असे मत डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे  Sharad Knute यांनी व्यक्त केले.

( शिक्षण बातम्यांसाठी eduvarta.com ला भेट द्या)

डीईएसच्या अहिल्यादेवी शाळेत व्यावसायिक अभ्यासक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींनी बनविलेल्या विविध कलाकृतींचे 'स्वच्छंद' या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी कुंटे बोलत होते. यावेळी कार्यवाह धनंजय कुलकर्णी, सदस्या प्राजक्ता प्रधान, मुख्याध्यापिका अनघा डांगे, उपमुख्याध्यापिका स्वाती मिश्रा, पर्यवेक्षिका चारुता प्रभुदेसाई आदी उपस्थित होते .

'स्वच्छंद' या प्रदर्शनाचे संयोजन हेमंत खळदकर, मेघना रत्नपारखी, आदिश्री भावे, मानसी देशपांडे, विद्या जितुरी, मोहन देशमुख, सुवर्णा परदेशी, सीमा डोईफोडे यांनी केले.