निराधारांना शैक्षणिक मदतीचा आधार; शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला होता.

निराधारांना शैक्षणिक मदतीचा आधार; शंभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

शिक्षणापासून (Education) वंचित असणाऱ्या निराधार मुलांना (Orphan Children) शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे महापालिकेचे (PMC) माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे (Dr. Siddharth Dhende) यांनी पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने पुण्यातील (Pune) ताडीवाला रोड येथील सावली संस्थेतील शंभर निराधार मुलांना त्यांनी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने (आठवले गट) पुण्यातील कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सावली संस्थेचे अमित मोहिते, आरपीआयचे जेष्ठ नेते बाळासाहेब जानराव, माजी नगरसेवक अशोक कांबळे, मंदार जोशी, बाबुराव घाडगे, बसवराज गायकवाड आदींसह विद्यार्थी या वेळी उपस्थित होते.

अजित पवारांच्या सुचनेकडे ‘एमआयडीसी’चा कानाडोळा; विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुली जोमात

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त १३२ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याचा संकल्प डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला होता. येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली जाणार असल्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला होता. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हा उपक्रम आयोजित केला. ताडीवाला रोड येथील सावली संस्थेमार्फत फुटपाथवर फिरणारी मुले, अनाथ मुले यांचा सांभाळ करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले जात आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत गती देण्यासाठी हा उपक्रम राबवल्याचे डॉ. धेंडे यांनी सांगितले.

या वेळी बाळासाहेब जानराव म्हणाले की, आई वडिलांचे लहानपणीच छत्र हरविल्यानंतर मुलांचे आयुष्य भरकटले जाते. त्यांना शिक्षण, नोकरी, योग्य जगण्याचे मार्गदर्शन होत नाही. शिक्षणापासून मुले दूर झाली तर ती गैरमार्गाला लागण्याची शक्यता असते. तसेच देशाची प्रगती देखील खुंटते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा डॉ. धेंडे यांचा उपक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. अनेकांनी हा उपक्रम हाती घेणे गरजेचे असल्याचे जानराव म्हणाले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/KjPbd0AYSAKB5Pt2g9yIHo