‘आयआयटी’मध्ये मुलींची संख्या वाढली; देशातील २३ संस्थांमध्ये ३ हजार ४२२ मुली

IIT गुवाहाटीने JEE Advanced २०२३ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, २३ IIT मध्ये सत्र २०२३-२४ साठी १७ हजार ३८५  जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १७ हजार ३४० जागांवर प्रवेश झाले आहेत.

‘आयआयटी’मध्ये मुलींची संख्या वाढली; देशातील २३ संस्थांमध्ये ३ हजार ४२२ मुली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

 

आता अभियांत्रिकी (Engineering) क्षेत्रात देखील मुलींच्या  संख्येत  लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. JEE Advanced-२०२३ च्या मेरिट स्कोअरच्या आधारे,  शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये सर्व २३ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मध्ये ३ हजार ४२२ जागांवर म्हणजे जवळपास २० टक्के जागांवर मुलींनी प्रवेश घेतला आहे. यापैकी ११ मुलींनी ओपन मेरिटमधून प्रवेश मिळवला आहे. या विद्यार्थिनींनी ऑल इंडिया रँकच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. 

 

IIT गुवाहाटीने JEE Advanced २०२३ चा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार, २३ IIT मध्ये सत्र २०२३-२४ साठी १७ हजार ३८५  जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी १७ हजार ३४० जागांवर प्रवेश झाले आहेत. एकूण ४३ हजार ५९६  विद्यार्थिनींनी JEE Advanced २०२३ साठी नोंदणी केली होती. यापैकी ७ हजार ५०९ विद्यार्थिनींनी JEE Advanced 2023 ची परीक्षा उत्तीर्ण केली होती.   

IIT, IIM, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये आता माजी विद्यार्थी कनेक्ट सेल

 

आयआयटी हैदराबाद झोनची नायकांती नागा भव्य मुलींमध्ये  टॉपर ठरली  होती आणि तिने अखिल भारतीय ५६ वा क्रमांक मिळवला होता. ३ हजार ४२२ मुलींनी गुणवत्तेच्या आधारावर आयआयटीमध्ये जागा मिळवल्या होत्या. यापैकी ३ हजार ४११ मुलींना मुलींच्या सुपर न्युमररी तर ११ मुलींना ओपन मेरिटमधून जागा मिळाल्या. यावर्षी विविध कारणांमुळे जेईई अॅडव्हान्स आणि प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयांमध्ये ५९ प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणांचा निकाल लागल्यानंतर मुलींच्या संख्येत आणखीन वाढ होऊ शकते. 

 

अहवालानुसार, आयआयटी हैदराबाद झोनमध्ये मुलींना सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत. येथे विविध IIT मध्ये १ हजार, १४० जागा देण्यात आल्या आहेत. तर आयआयटी दिल्ली झोन दुसऱ्या क्रमांकावर असून, ६६१ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे. तर  IIT बॉम्बे झोनला ५८२  जागांसह तिसरे स्थान मिळाले आहे, IIT खरगपूर झोनला ३६३ जागा चौथ्या स्थानावर आणि IIT कानपूर झोनला ३०२ जागा मिळाल्या आहेत. याशिवाय २६९ विद्यार्थिनींनी  आयआयटी रुरकी झोनमध्ये स्थान मिळाले आहे. सर्वात कमी क्रमांक आयआयटी गुवाहाटी झोनचा आहे. येथे केवळ १०५ विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला आहे.

 

अहवालात दिलेल्या माहितीनुसार,  यावेळी देखील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची पहिली पसंती केंद्र सरकारच्या NIRF रँकिंग (नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क) आणि आंतरराष्ट्रीय QS रँकिंगमध्ये भारतातील टॉपर संस्था आहेत. JEE Advanced 2023 मध्ये टॉप १०० स्कोअर असलेल्या ६५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी IIT मुंबईची  ची निवड केली आहे. तर  २० हून अधिक जणांनी आयआयटी दिल्ली आणि इतरांनी आयआयटी मद्रासची निवड केली आहे. मात्र, मागील वर्षांच्या तुलनेत प्रवेशाच्या ट्रेंडमध्ये तफावत दिसून आली आहे. आता टॉपर्स आयआयटी मुंबई  नंतर आयआयटी दिल्लीला प्राधान्य देत आहेत. 

केंद्र सरकारच्या नियमानुसार एकूण जागांपैकी पाच टक्के जागा दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव आहेत. या अंतर्गत 2023 च्या सत्रात  एकूण ८५७ जागांपैकी २६१ जागांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातील ३५० पैकी १०० जागांवर, ओबीसीच्या २३४ पैकी ९५ जागांवर, ईडब्ल्यूएसच्या ७९ पैकी ४४ जागांवर, अनुसूचित जातीच्या १३६ जागांपैकी १२ आणि एसटीच्या ५८ जागांपैकी १० जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यावेळी अपंग प्रवर्गातील सुमारे ६९.५  टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. 

 

तर  IIT मध्ये ७५ जागा अनिवासी भारतीयांना  देण्यात आल्या आहेत. सर्व ७५ जागा सर्वसाधारण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी होत्या. त्यामुळे सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या या जागा गमवाव्या लागल्या आहेत. प्रथमच, न्यायालयाच्या  निर्देशानुसार, अनिवासी भारतीयांना आयआयटीमध्ये सामान्य श्रेणीच्या जागा देण्यात आल्या आहेत. IIT मुंबई  झोनमध्ये जास्तीत जास्त ३९ OCI जागा आणि IIT हैदराबाद झोनमध्ये २३ OCI जागा सुरक्षित करण्यात आल्या आहेत.

 

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BPAVux2QlP06nhF9X9NQYO