IIT, IIM, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये आता माजी विद्यार्थी कनेक्ट सेल 

सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या माजी संस्थेशी जोडण्यासाठी ग्रुप मेसेज आणि ईमेलचा वापर करावा, जेणेकरून त्यांना सर्व माहिती पाठवता येईल, असे युजीसीच्या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आले आहे.

IIT, IIM, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये आता माजी विद्यार्थी कनेक्ट सेल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आयआयटी, आयआयएम, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये आता माजी विद्यार्थी कनेक्ट सेल (student connect cell) तयार केले जातील. देशी-विदेशी विद्यार्थ्यांचा डेटाही गोळा केला जाईल. संस्थेच्या सध्याच्या विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांच्या अनुभवांचा फायदा करून देणे (taking advantage of students' experiences) आणि कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मदत मिळवणे (Getting help with campus placement) हा त्याचा उद्देश असाणार आहे. माजी विद्यार्थी संस्थेच्या विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स, सेमिनार किंवा इतर कार्यक्रम इत्यादीद्वारे संवाद साधतील. त्याचबरोबर अभ्यासक्रम तयार करण्यासह संस्थेच्या विकासासाठी सहकार्य करू शकतील हे या सेलचे उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) (University Grants Commission -UGC) याबाबत मार्गदर्शक तत्त्वेही तयार केली आहेत.

हेही वाचा : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया वादात ? पुण्यातील पाच उमेदावर शर्यतीत

माजी विद्यार्थ्यांचा डेटा गोळा करताना त्यामध्ये  माजी विद्यार्थ्यांचे नाव, अभ्यासाचे वर्ष, आधीच  आणि सध्याचा पत्ता, नोकरी, व्यवसाय इत्यादींबद्दल माहिती गोळा केली जाईल.  याद्वारे विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट जोडून त्यांच्या व्यवसाय आणि नोकरीनुसार वेगवेगळे गट तयार केले जातील. यामुळे त्यांच्या आवडीनुसार आणि कामाच्या आधारे नवीन विद्यार्थी जोडण्यास मदत होईल. सर्व माजी विद्यार्थ्यांना त्यांच्या माजी संस्थेशी जोडण्यासाठी ग्रुप मेसेज आणि ईमेलचा वापर करावा, जेणेकरून त्यांना सर्व माहिती पाठवता येईल, असे युजीसीच्या मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आले आहे.

माजी विद्यार्थ्यांना सामुदायिक सेवा कार्यक्रमांशी जोडण्यासाठी सुद्धा या सेलचा वापर करण्यात येणार आहे. यामध्ये संस्थेच्या आजूबाजूचा परिसर, गावे इत्यादी लोकांसाठी विविध समाजसेवेचे कार्यक्रम सुरू करता येतील. या कार्यक्रमांना आर्थिक पाठबळ देऊन ते शिक्षण, आरोग्य, कृषी आणि महिलांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये सहभागी होऊ शकतात, असेही या मार्गदर्शक सांगण्यात आले आहे.