NEET UG : ...तर स्कोअरकार्ड ठरेल अवैध

परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार exams.nta.ac.in/NEET/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात.

NEET UG : ...तर स्कोअरकार्ड ठरेल अवैध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे (NEET UG 2024 Score card) स्कोअरकार्ड जारी केले आहे. परीक्षेला बसलेले सर्व उमेदवार exams.nta.ac.in/NEET/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे स्कोअरकार्ड डाउनलोड करू शकतात. टॉपर्सची यादी देखील लवकरच उपलब्ध होणार आहे.

त्याचबरोबर एनटीएने उमेदवारांना स्कोर कार्डवर फोटो आणि बारकोड उमटले नसल्यास ते स्कोर कार्ड अवैध मानले जाईल, असा सावधगिरीचा इशारा दिला आहे.

"कृपया तुमच्या स्कोअर कार्डवर तुमचा फोटो आणि बारकोड तपासा. जर फोटो आणि बारकोड गहाळ असेल तर पुन्हा डाउनलोड करा. फोटो आणि बारकोड शिवाय तुमचे स्कोअर कार्ड अवैध आहे." असे एनटीएच्या अधिकृत वेबसाइटवर लिहले आहे.   

यावर्षी, राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षा-अंडर ग्रॅज्युएट (NEET-UG) साठी विक्रमी 23 लाख उमेदवारांनी नोंदणी केली, ज्यामध्ये 10 लाखांहून अधिक मुले, 13 लाखांहून अधिक मुली आणि 24 तृतीय लिंग श्रेणीतील विद्यार्थी होते.

प्रदेशानुसार, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक म्हणजेच 3,39,125 उमेदवारांची नोंदणी झाली आहे, त्यानंतर महाराष्ट्रात 2,79,904 आणि राजस्थानमध्ये 1,96,139 उमेदवार आहेत तर तामिळनाडूमध्ये 1,55,216 आणि कर्नाटकात 1,54,210 नोंदणी झाली.

असा पाहा स्कोअर कार्ड

 सर्व प्रथम NEET exams.nta.ac.in/NEET/ च्या अधिकृत वेबसाइटवर जा. तिथे "ताज्या बातम्या" विभागाखालील "स्कोअर कार्डसाठी येथे क्लिक करा" या अधिसूचनेवर क्लिक करा. आता "NEET 2024 स्कोअर कार्डसाठी येथे क्लिक करा!" लिंकवर क्लिक करा. आता तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाका. स्कोअरकार्ड तपासा आणि भविष्यातील संदर्भासाठी डाउनलोड करा.