NEET UG 2024 : नांदेडची नेहा माने देशात पहिली 

नेहा कुलदीप माने हिनेडीपरच्या तीन परिक्षांमध्ये 651, 674 आणि 690 असे मार्क्स मिळाले होते. 

NEET UG 2024 :  नांदेडची नेहा माने देशात पहिली 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

NEET जाहीर  (NEET declared) झालेल्या परीक्षेच्या निकालामध्ये   नांदेडची विद्यार्थिनी नेहा कुलदीप माने हिने 720 पैकी 720 गुण मिळवून देशामध्ये प्रथम क्रमांक (Number one in the country) मिळवलेला आहे. तिला डीपरच्या तीन परिक्षांमध्ये 651, 674 आणि 690 असे मार्क्स मिळाले होते. 

आजपर्यंत डीपरच्या कारकिर्दीत अनेक उच्चांक प्रस्थापित झालेले आहेत. मात्र हा निकाल एक मैलाचा दगड ठरणार आहे. यापूर्वी देखील वैद्यकीयसाठी राज्याची एमएचटी-सीईटी असताना विद्यार्थ्याने 200 पैकी 200 गुण मिळवलेले आहेत. त्याचप्रमाणे 2014 मध्ये डीपर च्या यादीतील पहिले 10 विद्यार्थी आणि राज्याच्या यादीतील पहिले 10 विद्यार्थी सारखेच होते. त्यातही पहिला विद्यार्थी पहिलाच आणि त्याला मिळालेले गुण 672 राज्याच्या सरकारी परीक्षेत आणि डीपरच्या परीक्षेत सारखेच होते आणि जेव्हापासून NEET सुरू झाली त्या तीनही वर्षात 2017,2018,2019 मध्ये डीपरच्या परीक्षा देणारे विद्यार्थीच महाराष्ट्रात प्रथम होते. 

डीपरने एकापेक्षा एक सरस अशा निकालाची परंपरा कायम केली असली तरी  हा निकाल मात्र एक सर्वोच्च मानबिंदू आहे. कारण हा निकाल देशपातळीवरील आहे आणि या परीक्षेत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात नेहाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे.  केवळ तिनेच असे गुण मिळवले नसून यावर्षी 700 पेक्षा जास्त गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही  41 पर्यंत झालेली आहे. 

NEET सुरू झाल्यापासून एकूण 19 विद्यार्थी 700 गुण मिळवणाऱ्या कॅम्प मध्ये सामील होते, मात्र यावर्षी हा आकडा अनेक पटीने वाढलेला आहे. NEET प्रमाणेच यावर्षी JEE MAIN मध्ये सुद्धा खूप चांगला निकाल लागलेला आहे. यावर्षीच्या टॉपरला 99.983 पर्सेंटाइल असून 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना 99 पेक्षा जास्त पर्सेंटाइल प्राप्त झालेले आहेत. जेईई मध्ये राज्यात प्रथम येणे एवढेच डिपरच्या व्यासपीठावर शिल्लक राहिलेले आहे.  MHT-CET मध्ये तर आतापर्यंत अनेकदा राज्यामध्ये पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांची नोंद आहे.

डीपर यावर्षी 19 व्या वर्षी पदार्पण करत असताना एकूण लागलेल्या 18 निकालांमध्ये 15 वेळा राज्यात प्रथम क्रमांक  मेडिकल आणि इंजीनियरिंग प्रवेश परीक्षांमध्ये मिळवलेला आहे. हे यश त्या त्या विद्यार्थ्यांचे असून त्यांनी ज्या कॉलेज आणि क्लासेसमधून स्वतःची तयारी केली, त्या सर्वांचं त्याच्यामध्ये मोठे योगदान आहे.