NEET Result 2024 : वेद सुनीलकुमार,अरिफीनसह 67 उमेदवारांना AIR रँक 1, कटऑफ वाढला

या सर्व उमेदवारांना 99.997129 टक्के गुण मिळाले आहेत. नीट परीक्षेत 2024 मध्ये महाराष्ट्रातील वेद सुनीलकुमार शेंडे याने सर्वसाधारण गटात अव्वल स्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा सय्यद आरिफीन युसूफ एम आहे, तोही सर्वसाधारण गटातील आहे.

NEET Result 2024 : वेद सुनीलकुमार,अरिफीनसह 67 उमेदवारांना AIR रँक 1, कटऑफ वाढला

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NEET 2024 Result) ने 4 जून रोजी NEET परीक्षेचा निकाल जाहीर (NEET Exam Result Declared) केला. यावर्षी 13.16 लाख मुले NEET परीक्षेत उत्तीर्ण झाली असून 67 उमेदवार रँक 1 मिळवण्यात (67 candidates got rank 1) यशस्वी झाले आहेत. या सर्व उमेदवारांना 99.997129 टक्के गुण मिळाले आहेत. नीट परीक्षेत 2024 मध्ये महाराष्ट्रातील वेद सुनीलकुमार शेंडे याने सर्वसाधारण गटात अव्वल स्थान पटकावले आहे. दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडूचा सय्यद आरिफीन युसूफ एम आहे, तोही सर्वसाधारण गटातील आहे. तिसऱ्या क्रमांकावर राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील मृदुल आनंद (ओबीसी-एनसीएल) याचे नाव आहे. 

NEET UG परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना 50 टक्के गुण आवश्यक आहेत. NEET निकाल 2024 सोबत NTA ने NEET UG कट ऑफ देखील जारी केला आहे. यंदा सर्व श्रेणींसाठी NEET 2024 कटऑफ वाढवण्यात आला आहे. यावर्षी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET UG साठी नोंदणी केली होती. यापैकी २३ लाख ३३ हजार २९७ किंवा ९६.९% उमेदवार परीक्षेला बसले होते तर १३ लाखांहून अधिक म्हणजे ५६.४% उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. यंदा NEET साठी नोंदणीमध्ये 16.85% वाढ झाली आहे. परीक्षेसाठी एकूण 24 लाख 6 हजार 079 उमेदवारांनी नोंदणी केली होती, तर गेल्या वर्षी 20.59 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते.

या वर्षी सर्वसाधारण प्रवर्गातील ३ लाख ३३ हजार ९३२, ईडब्ल्यूएसचे १ लाख १६ हजार २२९, ओबीसी प्रवर्गातून ६ लाख १८ हजार ८९०, एससी प्रवर्गातून १ लाख ७८ हजार ७३८ आणि एसटी प्रवर्गातून ६८ हजार ४७९ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. वैद्यकीय समुपदेशन समिती (MCC) अखिल भारतीय कोट्यातील (AIQ) 15 टक्के जागांसाठी समुपदेशन करते. उर्वरित ८५ टक्के प्रवेशासाठी सर्व राज्यांचे संबंधित अधिकारी जबाबदार आहेत. NEET परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सीट मॅट्रिक्स आणि समुपदेशनात सहभागी होणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयांची यादी तपासण्यासाठी MCC च्या अधिकृत वेबसाइट mcc.nic.in वर भेट देऊ शकतात. NTA लवकरच या वर्षासाठी समुपदेशन वेळापत्रक जाहीर करेल. गेल्या वर्षी, NEET UG साठी समुपदेशनाची पहिली फेरी 20 जुलै रोजी सुरू झाली.