नववीत नापास झाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या; आत्महत्येस शाळा प्रशासन जबाबदार; पालक संघटनेचा आरोप  

निकालाचे पेपर आम्हाला दाखविण्यात यावे, अशी मागणी पालकांनी शाळेकडे केली. परंतु, विद्यार्थिनीचे पेपर हे दाखविता येणार नाहीत, असे शाळेने स्पष्टपणे सांगून पेपर देण्यास नकार दिला. त्यामुळे अनुत्तीर्ण  झालेल्या या मुलीने त्यानंतर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

नववीत नापास झाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या;  आत्महत्येस शाळा प्रशासन जबाबदार; पालक संघटनेचा आरोप  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इयत्ता दहावीचा निकाल 100 टक्के लागावा यासाठी काही शाळांकडून अभ्यासात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना नववीत नापास (Failed in ninth class) केले जाते .मात्र,त्यामुळे विद्यार्थी नैराश्यात (Students are depressed)जातात आणि त्यातून टोकाचे पाऊल उचलतात. पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यातीत एका अल्पसंख्यांक शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीचा इयत्ता नववीचा निकाल (Class IX Result) नापास म्हणून आला. त्यातून नैराश्यात गेलेल्या विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide of a student) केली. मात्र, विद्यार्थिनी केलेल्या आत्महत्येचा प्रकार हा अत्यंत दुर्दैवी असून, या घटनेला शाळा प्रशासनच जबाबदार आहे, असा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करावी,अशी मागणी महा पेरेंट्स पालक संघटनेचे शहर अध्यक्ष दिलीपसिंग विश्वकर्मा Dilip Singh Vishwakarma) यांनी केली. 

पुणे शहरातील अनेक नामवंत शाळा आपल्या शाळेचा दहावीचा निकाल चांगला लागावा, या उद्देशाने नववीत मुलांना जाणीवपूर्वक नापास करतात. तसेच आपल्या पाल्याला शाळेतून काढून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्या, असे पालकांना सांगतात. पुण्यात यापूर्वी असे अनेक प्रकार घडले आहेत.मात्र, इयत्ता नववीतील वि‌द्यार्थ्यांना जाणीवपूर्वक नापास करून त्याचे शैक्षणिक भवितव्य उध्वस्त करू पाहणाऱ्या मुजोर शाळांवर कारवाई करून शासनाने जागरुकता दाखवावी,अशी मागणी दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी केली. तसेच पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र आहीरे यांची भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी  दिलीपसिंग विश्वकर्मा यांच्यासह डॉ. संजय कुंबरे, जयसिंग आऊजी,सुरेश सोनी, भरत आऊजी, संजू परिहार आदी उपस्थित होते.तसेच संघटनेतर्फे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनाही संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

इयता नववीच्या निकालात अनुत्तीर्ण  झाल्यामुळे वि‌द्यार्थिनीच्या पालकांनी तिची रीटेस्ट घेण्यात यावी, अशी मागणी शाळेकडे करण्यात आली .शाळेने या मुलीची रीटेस्ट देखील घेतली, परंतु, तेव्हा देखील मुलीचा निकाल अनुत्तीर्ण असा आला. या निकालामुळे पालकांनी रीटेस्टचे पेपर आम्हाला दाखविण्यात यावेत, अशी मागणी शाळेकडे केली. परंतु, विद्यार्थिनीचे पेपर हे दाखविता येणार नाहीत, असे शाळेने स्पष्टपणे सांगून पेपर देण्यास नकार दिला. त्यामुळे अनुत्तीर्ण  झालेल्या या मुलीने त्यानंतर आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. 

आत्महत्येची घटना ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह अशी आहे. या बाबत शिक्षण मंडळाने स्वतः जातीने लक्ष घालून, अशा गैरप्रकार करणाऱ्या शाळांवर  कठोर कारवाई करून या शाळांची मान्यता रद्द करावी. अशा प्रकारच्या घटना पुणे शहरातील तसेच जिल्ह्यातील कोणत्याही शाळांमध्ये पुन्हा होणार नाहीत, यासाठी शासनाने त्वरित पावले उचलून याबाबत कडक उपायोजना कराव्यात,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच यावर शासनाने गंभीरपणे लक्ष न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिलीपसिंग विश्वकर्मा यांनी दिला आहे.