DRDO मध्ये अप्रेंटिसशिपची सुवर्ण संधी; अर्ज प्रक्रिया सुरु 

या भरतीमध्ये निवड झालेल्या पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 9 हजार रुपये, 12वी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर इन डिप्लोमा सायन्स उमेदवारांना दरमहा 8 हजार रुपये स्टायपेंड दिला जाईल.

DRDO मध्ये अप्रेंटिसशिपची सुवर्ण संधी; अर्ज प्रक्रिया सुरु 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) मध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.  DRDO ने डिफेन्स सायंटिफिक इन्फॉर्मेशन अँड डॉक्युमेंटेशन सेंटर (Defense Scientific Information and Documentation Centre) मध्ये अप्रेंटिसशिप पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी अधिसूचना जारी करून अर्ज प्रक्रिया (Application Process) सुरू करण्यात आली आहे. DRDO मध्ये अप्रेंटिसशिप (Apprenticeship) करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवाराला प्रथम mhrdnats.gov.in किंवा nats.education.gov.in या पोर्टलवर ऑनलाइन माध्यमातून स्वतःची नोंदणी (Online registration on the portal) करावी लागेल.

ऑनलाइन नोंदणीनंतर उमेदवारांनी ऑफलाइन अर्ज भरून  सर्व आवश्यक कागदपत्रे जोडून तो अर्ज  To, The Director, DESIDOC, Metcalfe House, Delhi-110054 वर पाठवावा. अर्जाची अंतिम तारीख 4 मार्च आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना दरमहा 9 हजार रुपये, 12वी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर इन डिप्लोमा सायन्स उमेदवारांना दरमहा 8 हजार रुपये स्टायपेंड दिले जाईल.

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी डिप्लोमा इन लाइब्रेरी सायन्स आणि मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी किंवा लाइब्रेरी आणि  इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये डिप्लोमा किंवा कॉम्प्युटर सायन्स मधील डिप्लोमासह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. भरतीबद्दल तपशीलवार माहितीसाठी इच्छूकांनी अधिसूचना पाहावी,असे आवाहन डीआरडिओने केले आहे.