शैक्षणिक कागदपत्रांवर वडिलांसोबत आईचेही नाव; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय 

जिथे पालकाचे नाव असेल तिथे आई आणि वडील दोघांचेही नाव असेल, असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला.

शैक्षणिक कागदपत्रांवर वडिलांसोबत  आईचेही नाव; दिल्ली हायकोर्टाचा निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शैक्षणिक प्रमाणपत्रे (Educational certificates) आणि पदव्यांवर जिथे पालकाचे नाव असेल तिथे आई आणि वडील दोघांचेही नाव (mother and father name) असेल, असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने (Delhi high court) दिला आहे. कायद्याच्या विद्यार्थ्याच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती सी हरी शंकर यांच्या खंडपीठाने (Justice C Hari Shankar Bench) हा निर्णय दिला आहे. 

या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की, "प्रमाणपत्राच्या मुख्य भागामध्ये दोन्ही पालकांची नावे अनिवार्यपणे नमूद करणे आवश्यक आहे. केवळ वडिलांच्या नावाला काही अर्थ नाही, यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वादाची गरज नाही." 

विधी पदवीधर रितिका प्रसाद यांनी ही याचिका दाखल केली होती. पाच वर्षांच्या बीए एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर त्यांना जी पदवी देण्यात आली त्यावर फक्त त्याच्या वडिलांचे नाव लिहिले होते, आईचे नाही. पदवीवर आई आणि वडील दोघांचेही नाव असायला हवे, अशी याचिका राधिकाने दाखल केली आहे. 

न्यायालयाचे म्हणणे आहे की, ही बाब साधी वाटली तरी त्याची संपूर्ण चर्चा केली तर हा सामाजिक महत्त्वाचा मुद्दा आहे. यासंदर्भात यूजीसीने 6 जून 2014 रोजी परिपत्रक जारी केले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावर न्यायालयाने खंतही व्यक्त केली आहे. ही बाब गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठाची आहे. 

न्यायालयाने विद्यापीठाला 15 दिवसांची मुदत दिली आहे. या स्थगितीमध्ये, विद्यापीठाला दुसरे प्रमाणपत्र प्रसिद्ध करावे लागेल, ज्यामध्ये आई आणि वडील दोघांची नावे असतील, असे नमूद करण्यात आले आहे.