JNU : देशविरोधी घोषणांमुळे 'जेएनयू' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

पुन्हा एकदा या द्वेषपूर्ण घोषणेने नव्या वादाला तोंड फोडले आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये अनेकवेळा देशविरोधी गोष्टी लिहिल्या आणि बोलल्या गेल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

JNU : देशविरोधी घोषणांमुळे 'जेएनयू' पुन्हा वादाच्या भोवऱ्यात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

देशविरोधी भाषणे, घोषणा यामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा वाद निर्माण  झाला आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये स्कूल ऑफ लँग्वेजच्या आतील भिंतींवर पुन्हा एकदा देशविरोधी (फ्री काश्मीर), सरकारविरोधी  आणि भगवा जलेगा अशा घोषणा लिहिण्यात आल्या आहेत. 

 

पुन्हा एकदा या द्वेषपूर्ण घोषणेने नव्या वादाला तोंड फोडले आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये अनेकवेळा देशविरोधी गोष्टी लिहिल्या आणि बोलल्या गेल्याचे अनेकदा दिसून आले आहे, तरीही जेएनयू प्रशासन अशा कारवायांना आळा घालण्यात अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे. शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

विद्यापीठातील १११ प्राध्यापक पदाच्या जाहिरातीची प्रतीक्षा संपली

 

समोर आलेल्या माहितीनुसार ज्या भिंतीवर देशविरोधी स्लोगन लिहिण्यात आले होते, त्या भिंती नंतर पुन्हा स्वच्छ करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे यावेळी विद्यापीठातील काही प्राध्यापकांच्या  नेमप्लेट वर काळे फासण्यात आले होते. दरम्यान ही घोषणा कोणी आणि कधी लिहिली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप या विषयी कोणताही खुलासा झालेला नाही. विद्यापीठ प्रशासनाकडून याविषयी अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांकडून करण्यात आला आहे. 

 

या संदर्भात एबीव्हीपी कडून  जेएनयू प्रशासनाला एक निवेदन देण्यात आले आहे, "अशा लज्जास्पद कृत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र, खेदाची बाब म्हणजे अशी घटना जेएनयूमध्ये पहिल्यांदाच घडत नाहीये.  यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत, मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. असे असले तरी अशी घृणास्पद कृत्ये शेवटी कोण करत आहेत, याबाबत प्रशासन निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाही," असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान गेल्या अनेक वर्षांपासून कॅम्पसमध्ये विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकांवर बंदी होती. यावर्षी पुन्हा या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यामध्ये एबीव्हीपी बहुमताने विजयी ठरले आहे.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/C7TQkXfHFg4DDfemew846j