मायनर कायद्यात आता बदल व्हावा;चंगळवादामुळे तरुणाई बिघडली,कल्याणीनगर अपघातावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया 

वय वर्षे  16 किंवा 17 असेल तरी दोषींना सर्व सामान्य कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, असा समाज हिताचा विचार करून सरकारने मायनर कायद्यात बदल करायला हवेत. 

मायनर कायद्यात आता बदल व्हावा;चंगळवादामुळे तरुणाई बिघडली,कल्याणीनगर अपघातावर तज्ज्ञांच्या प्रतिक्रिया 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मौज, मजा, मस्ती, डान्स , पार्ट्यांमध्ये पैसा उडवणाऱ्या श्रीमंतांच्या अल्पवयीन मुलांना व्यसनांच्या आहारी (Addictions)लावण्याचा गोरख धंदा पुण्यातील काही पब मालकांकडून (Pub owner) केला जात आहे. त्यात चंगळवादाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईला या पब संस्कृतीची(Pub culture)नशाच चढली आहे. मात्र,काही पब मधून अल्पवयीन मुलांना आमली पदार्थ (Narcotics to minors)दिले जात असल्याचे बोलले जात आहे .त्यातूनच अनेक अनुचित प्रकार घडत आहेत. पाश्चात्य संस्कृतीच्या नावाखाली सुरू असलेला हा नंगानाच शहराचे वातावरण बिघडवत आहे.त्याला वेळीच आवर घातला नाही तर देशाचे भवितव्य घडवणारी तरूणाईच हाताबाहेर जाईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तसेच आता मायनर कायद्यात बदल (Changes in Minor Laws)करण्याची वेळ आली असल्याचे कायदे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

पुण्यात कल्याणीनगर (Kalyaninagar)परिसरात एका बड्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने आलिशान कारने दुचाकीवरून जात असलेल्या तरुण -तरुणीला पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास उडवले.या अपघातात अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला.या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आलिशान कार चालवणाऱ्या बिल्डरच्या मुलावर गुन्हा दाखल केला आहे.अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही सॉफ्टवेअर इंजिनियर असून ते मूळचे मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गाडी चावणारा मुलगा अल्पवयीन असल्याने कोणत्याही शिक्षेविना तो या प्रकरणातून सूटू शकतो.गाडी चालवणारे मद्यधुंद अवस्थेत गाडी चावत होते की नाही, हे आरोग्य तपासणी अहवालातून समोर येईलही.मात्र,या आपघातात दोघांचा जीव गेला,याला जबाबदार कोण ? याच्या मुळाशी गेले तर तरुणाईला व्यसनांच्या आहारी लावणारे सुध्दा तितकेच गुन्हेगार दोषी आहेत.त्यामुळे अल्पवयीन मुलांना मद्य देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

-----------------------------------------------

 " पालकांनी अल्पवयीन मुलांना गाडी देऊ नये.आपली मुले रात्री बारानंतर कुठे जातात ,त्यांना कोणत्या सवई आहेत.तसेच ते कोणाच्या संगतीत राहतात. हे पाहणे  केवळ  पालकांच्या भल्याचे नाही तर समाजाच्याही भल्याचे आहे.अठरा वर्षे पूर्ण न झालेल्या मुलांना जर पालकांनी स्वत:गाडी दिली असेल तर पालकांवर सुध्दा जबाबदारी निश्चित व्हायला हवी.कल्याणी नगर अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.तसेच वय वर्षे  16 किंवा 17 असेल तरी दोषींना सर्व सामान्य कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, असा समाज हिताचा विचार करून सरकारने मायनर कायद्यात बदल करायला हवेत. 
 - ॲड. एस. के. जैन, जेष्ठ विधीज्ञ , पुणे 

---------------
 श्रीमंत पालकांचे आपल्या पाल्याकडे दूर्लक्ष होत आहे. पालकांनी पाल्याविषयी सतर्क राहण्याची गरज असून त्यांची संगत आणि सवई यावर लक्ष ठेवण्याची वेळा आलेली आहे.तसेच पालकांचा मुलांवर धाक असलाच पाहिजे.कायद्याने सुध्दा अशा पुन्हा घटना घडू नयेत म्हणून दोषीला शिक्षा करावी.त्यातून समाजात योग्य संदेश जाईल.तसेच तरुणाईने चंगळवादाच्या आहारी न जाता आपले ध्येय निश्चित करून कुठे जायचे हे ठरवणे गरजेचे आहे.

-डॉ.अरुण अडसूळ, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ