NEET UG परीक्षेसाठी ड्रेसकोड बंधनकारक ; परीक्षेला जाताना कोणते कपडे चालणार नाही

NEET UG 2024 मध्ये महिला उमेदवारांना लेगिंग्ज आणि पॅलाझोला परवानगी नाही.

NEET UG परीक्षेसाठी ड्रेसकोड बंधनकारक ; परीक्षेला जाताना कोणते कपडे चालणार नाही

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) 5 मे रोजी NEET UG 2024 आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.  परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना एनटीएने दिलेल्या काही मार्गदर्शक तत्त्वांची आणि सूचनांची माहिती असणे आवश्यक आहे. पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी (male and female candidates) NEET ड्रेस कोडचे (Dress code) पालन करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये (Examination Hall)बसता येणार नाही. 

असा आहे उमेदवारांसाठी NEET ड्रेस कोड

* पुरुष उमेदवारांसाठी फक्त हाफ स्लीव्ह शर्ट आणि टी-शर्ट घालण्याची परवानगी आहे.
* पुरुष उमेदवारांना साधी पँट घालण्याची परवानगी आहे.
* पुरुष उमेदवारांच्या पोशाखात झिप पॉकेट्स, मोठी बटणे, सिक्विन किंवा भरतकाम असलेले जड कपडे असू नयेत.
* पुरुष उमेदवारांना हलके आणि साधे कपडे निवडण्याचा सल्ला दिला जातो.
* महिला उमेदवारांना ब्रोचेस, फुले, बॅज किंवा जीन्स घालण्यास मनाई आहे.
* महिला उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये कानातले, नाकातील अंगठी, पेंडंट, हार इत्यादी  वस्तूंना सक्त मनाई आहे.
* महिला उमेदवार हलक्या रंगाची डेनिम पॅन्ट आणि हाफ स्लीव्ह टी-शर्ट निवडू शकतात. मात्र, शर्टची बटणे मध्यम आकाराची असावीत.
* परीक्षेदरम्यान महिला उमेदवारांना कुर्ती घालण्याची परवानगी नाही.
* NEET UG 2024 मध्ये महिला उमेदवारांना लेगिंग्ज आणि पॅलाझोला परवानगी नाही.


NTA ने पुरुष आणि महिला उमेदवारांसाठी NEET ड्रेस कोडचे निश्चित केला आहे. ज्याचे पालन NEET UG परीक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रावर करणे आवश्यक आहे. यावर्षी 24 लाखांहून अधिक उमेदवार NEET UG परीक्षेला बसणार आहेत.

शीख उमेदवार परीक्षेच्या वेळी पगडी घालू शकतात आणि कंघी, बांगडी, किरपाण घेऊन जाऊ शकतात. परीक्षेदरम्यान महिला उमेदवार बुरखा घालू शकतात.मात्र,  अशा उमेदवारांना योग्य पडताळणीसाठी परीक्षेच्या दिवशी दुपारी 12:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचावे लागेल. यामुळे उमेदवारांची गैरसोय होणार नाही.