रेल्वेत मेगा भरती ! फेक माहितीचा सुळसुळाट, PIB फॅक्ट चेकने उघड 

रेल्वे संरक्षण दलासाठी एकूण 4 हजार 660 पदे भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण ही जाहिरात खोटी असल्याचे PIB फॅक्ट चेकने उघड केले आहे. 

रेल्वेत मेगा भरती ! फेक माहितीचा सुळसुळाट, PIB फॅक्ट चेकने उघड 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

रेल्वेत नोकरी (Railway recruitment) मिळवण्याची इच्छा असणाऱ्या युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. याचाच गौरफायदा काही असामाजिक घटक घेत असल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे विभागाची जाहिरात (Advertisement of Railway Department) असे भासवत काही दिवसांपूर्वी एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत रेल्वे संरक्षण दलासाठी (Railway Protection Force) एकूण 4 हजार 660 पदे भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण ही जाहिरात खोटी (false advertising) असल्याचे PIB फॅक्ट चेकने (PIB Fact Check) उघड केले आहे. 

रेल्वेने RPF भरती अंतर्गत कोणतीही भरती केलेली नाही. सोशल मीडिया आणि इतर जॉब प्लॅटफॉर्मवर फिरत असलेली ही नोटीस बनावट आहे. या जाहिरातीमध्ये असे देण्यात आले होते की,  रेल्वे भर्ती बोर्डाने RPF कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टरच्या पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोटीस मध्ये दिलेल्या माहितीनुसार 14 एप्रिल 2024 पासून अर्ज सुरू होतील आणि या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 मे 2024 आहे. ही सर्व माहिती चुकीची आहे, असे ट्विट रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे. 

ही भरती रेल्वे संरक्षण दलासाठी असून त्याअंतर्गत एकूण 4 हजार 660 पदे भरण्यात येणार असल्याचेही या बनावट नोटीसमध्ये देण्यात आली होते. यापैकी 4 हजार 208 पदे हवालदाराची आणि 452 पदे SI म्हणजेच उपनिरीक्षकाची आहेत. SI एक्झिक्युटिव्ह आणि कॉन्स्टेबल (RPF आणि RPSF मध्ये) या पदांसाठी फक्त ऑनलाइन अर्ज करा, असे सांगण्यात आले. ही सर्व माहिती चुकीची आहे.