व्यवसायाची व्याप्ती पाहता सीएंना नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची गरज  आयसीएआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी यांचा सल्ला 

तंत्रज्ञानामुळे सीएची परीक्षा पास झाल्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन सदस्यत्व प्राप्त करणे शक्य झाले असून इन्स्टिट्यूटच्या इतरही सुविधा तातडीने मिळवता येतात.

व्यवसायाची व्याप्ती पाहता सीएंना नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याची गरज  आयसीएआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी यांचा सल्ला 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क / पुणे 

 “सीएंचा व्यवसाय केवळ अकाउंटींग आणि ऑडिटींगपुरता मर्यादित न राहता तो व्यापक बनला आहे. त्यासाठी विविध नवे कायदे, सॅप, इआरपी, एआय, ब्लॉकचेनसारखे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल," असा सल्ला दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाचे  (आयसीएआय) चे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी यांनी दिला.

पुणे आयसीएआयच्या वतीने आयोजित संवाद कार्यक्रमात सीए तलाठी बोलत होते.यावेळी पुणे आयसीएआयचे अध्यक्ष सीए राजेश अग्रवाल, उपाध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, सचिव सीए अजिंक्य रणदिवे, खजिनदार सीए हृषीकेश बडवे, कार्यकारिणी सदस्य सीए काशिनाथ पठारे, सीए सचिन मिनियार, सीए प्रणव आपटे, सीए प्रितेश मुनोत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सीएच्या प्रस्तावित नव्या अभ्यासक्रमाविषयी बोलताना सीए तलाठी म्हणाले, " अभ्यासक्रमात बदल करून 'सेल्फ पेस लर्निंग मॉडेल' तयार करण्यात येत आहे. तंत्रज्ञानामुळे सीएची परीक्षा पास झाल्याच्या दिवशीच विद्यार्थ्यांना ऑनलाईन सदस्यत्व प्राप्त करणे शक्य झाले असून इन्स्टिट्यूटच्या इतरही सुविधा तातडीने मिळवता येतात." 

    सीए तलाठी म्हणाले, " "सनदी लेखापाल घडवणारी 'आयसीएआय' संस्था पंचाहत्तराव्या वर्षात पदार्पण करत असून, सध्या भारताची अर्थव्यवस्था साडेतीन ट्रिलीयन इतकी आहे. संस्था शताब्दी महोत्सव साजरा करतेवेळी म्हणजे २०४९ मध्ये भारतीय अर्थव्यवस्था ३५ ट्रिलीयनची होईल, असा अंदाज आहे. त्यावेळी गरज असलेली सीएंची संख्या, गुणवत्ता आणि दर्जा याचा अंदाज बांधून आतापासूनच नियोजन महत्वाचे असून, त्यादृष्टीने आम्ही पायाभरणी करत आहोत,”

   या वेळी बोलताना आयसीएआय च्या केंद्रीय समितीचे सदस्य सदस्य सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, " वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाउंटन्ट्स झाल्यानंतर जगाचा 'आयसीएआय'कडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे.  सिंगापूर असोसिएशन ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स या संस्थेने तिथे चार्टर्ड अकाउन्टन्सीची प्रॅक्टिस करण्यासाठीचे नियम एकदम शिथिल करण्याचा निर्णय सकारात्मक आहे." 
 सीए अजिंक्य रणदिवे यांनी प्रास्ताविक केले. तर  सीए हृषीकेश बडवे यांनी सूत्रसंचालन केले. सीए अमृता कुलकर्णी यांनी आभार मानले.