जंगले शाश्वत विकासाची गुरुकिल्ली : संगीता तोडमल

जंगले नष्ट झाली तर निश्चितच पुढच्या पिढीसाठी ती धोक्याची घंटा असेल, असे मत डॉ. संगीता तोडमल यांनी व्यक्त केले.

जंगले शाश्वत विकासाची गुरुकिल्ली : संगीता तोडमल

जंगले ही शाश्वत विकासाची गुरुकिल्ली असून पर्यावरणीय स्तर , आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी जंगले forest जगली पाहिजेत. जंगले नष्ट झाली तर निश्चितच पुढच्या पिढीसाठी ती धोक्याची घंटा असेल, असे मत डॉ. संगीता तोडमल (Sangita todmal ) यांनी व्यक्त केले.

 आंतरराष्ट्रीय जंगल दिनानिमित्त आयआययु  या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ( international internship university) या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे आयोजित ऑनलाइन चर्चासत्रात तोडमल बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरीमा पोलंड या होत्या.भारतातून डॉ. कस्तुरी नाईक, ओम प्रकाश शर्मा, डॉ.सुरिना शर्मा ,अर्जुन सिंग यांनी सहभाग घेतला.या चर्चासत्रात सेंट्रो कोस्टा , मरिया फर्नांडो, निकोलस बारनस, एलिझाबेथ इसाल्यास आदींनी आपली मते प्रभावीपणे मांडली.

डॉ.संगीता तोडमल -इंगुळकर मूळच्या सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील असून या पर्यावरण अभ्यासक आहेत. विविध सामाजिक संस्था आणि राज्य शासनाचे पर्यावरण विषयक विविध उपक्रम यावर त्या अमेरिकेतून मार्गदर्शन करतात. तसेच जगभरातील पर्यावरण विषयक कॉन्फरन्स मध्ये सहभाग घेऊन जाणीव जागृती करण्याचे काम करतात.

     संगीता तोडमल यांनी अमेरिकेत भारतीय भाज्या आणि भारतीय शेती फुलवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपल्या परसबागेत सुमारे ५० हून अधिक वेगवेगळ्या फळभाज्या, फुलबाज्या, पालेभाज्या वेलवर्गीय भाज्या लावून त्यावर विविध प्रयोग केले आहेत. पालेभाज्या, फळभाज्या किंवा टेरेस गार्डन परसबाग आशा विविध विषयांवर महिला बचत गट हाउसिंग सोसायटी यामध्ये त्या अनेक वर्ष मोफत मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी हा भाजीपाला सेंद्रिय पद्धतीने केले असून घनकचरा व्यवस्थापनातून त्यांनी स्वतः सेंद्रिय खते तयार केली आहेत.तसेच अमेरिकेतील अनेक सामाजिक संस्थांबरोबर त्यांच्या उपक्रमात सहभागी होऊन पर्यावरण विषयक चळवळ सुरू केलेली आहे.