MSBSVET : कौशल्य, व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

जपासून (दि. १० मे) विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. तर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत होणार आहे.

MSBSVET : कौशल्य, व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
MSBSVET Couses Admission Process

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य कौशल्य, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाच्या (MSBSVET) विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार आजपासून (दि. १० मे) विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी (Admission) ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करता येणार आहे. तर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती १५ जून ते ३१ जुलै या कालावधीत होणार आहे.

मंडळाचे संचालक योगेश पाटील (Yogesh Patil) यांनी वेळापत्रकाविषयी माहिती दिली. त्यानुसार मागील दोन-तीन वर्षात कोरोना (Covid 19) विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे प्रवेश सत्र २०२०-२१, २०२१-२२, व २०२२-२३ मधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास विलंब झाला. प्रवेश सत्र पूर्ण करण्यास झालेला विलंब तसेच प्रवेशाच्या तारखेमध्ये देण्यात आलेली मुदत वाढ याचा थेट परिणाम प्रशिक्षणावर होतो. यामुळे प्रशिक्षणासाठी उपलब्ध असलेला कालावधी कमी झाल्याने प्रशिक्षणाच्या गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या कौशल्यावर विपरित परिणाम होत असतो.

जिल्हा परिषद भरतीची प्रतीक्षा संपली ; अभ्यासक्रम झाला प्रसिध्द

यापार्श्वभूमीवर प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ साठीची प्रवेश प्रक्रिया विहित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजित आहे. प्रवेश प्रक्रिये दरम्यान सर्व कार्यवाही नियोजनबध्द पध्दतीने करण्याकरिता वेळापत्रक घोषित करण्यात येत आहे. तसेच  राज्यातील प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेश क्षमतांचा पूर्ण वापर व्हावा व प्रशिक्षणाच्या १०० टक्के जागा भरल्या जाव्यात यासाठी प्रवेश प्रोत्साहन अभियान राबविण्यात येण्यार आहे.

अभियानामध्ये मंडळाच्या अभ्यासक्रमांची माहिती, शिकाऊ प्रशिक्षण योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या उपलब्ध होणाऱ्या संधी, अभ्यासक्रमांची समकक्षता, उच्च शिक्षणाची संधी आदी माहिती विविध माध्यमांतून प्रसिध्द केली जाणार आहे. राज्यात आयोजित होणाऱ्या विविध मार्गदर्शन शिबिरे, समुपदेशन शिबिरे, रोजगार मेळावे यामध्ये संस्थांनी सहभाग घेऊन मंडळाच्या अभ्यासक्रमांची माहिती प्रवेशोच्छुक उमेदवार व पालकांना द्यावी, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

RTE 2023 : प्रवेशासाठी आता शेवटची संधी; १५ मेनंतर मुदतवाढ नाही

प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे -

- दि. १० ते २५ मे : ज्या संस्थांनी २०२२ ते २०२५ करिता नुतनीकरण घेतले नाही त्या संस्थांनी नुतनीकरण प्रस्ताव संबंधीत जिल्हा कार्यालयांकडे सादर करणे. ज्या संस्थांना प्रशिक्षण वर्ष २०२२-२३ पासुन नव्याने शासन मान्यता प्राप्त झाली आहे. अशा संस्थांनी देखिल पुढील ३ वर्षांच्या नुतनीकरणासाठी संबंधीत जिल्हा कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे व नुतनीकरण शुल्क भरणे अनिवार्य आहे.

- दि. १० मे ते ५ जून : जिल्हा कार्यालयांनी नुतणीकरण प्रस्ताव प्रादेशिक कार्यालयांमार्फत मंडळास सादर करणे.

- दि. १० जून : प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ साठी संस्था निहाय उपलब्ध अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता यादी मंडळाव्दारे प्रसिध्द करणे.

- दि. १० मे ते ३१ जुलै : प्रवेश सत्र ऑगस्ट २०२३ साठी उमेदवारांची नोंदणी करणे (Registration)

          - दि. १५ जून ते ३१ जुलै : प्रवेशासाठी संस्थानिहाय अर्ज करणे

- दि. १५ जून ते ३१ जुलै : संस्थांव्दारे प्रवेश निश्चित करणे

- दि. १ ऑगस्ट : प्रशिक्षण वर्ष २०२३-२४ साठी नियमित प्रशिक्षण सुरू करणे

- दि. १ जुलै ते ३१ ऑगस्ट : जिल्हा कार्यालयांव्दारे प्रवेश मान्यता देणे

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2