जिल्हा परिषद पद भरतीचा अभ्यासक्रम बदलल्याने विद्यार्थ्यांचा संताप  

गेली चार ते पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेचे रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. ग्रामविकास विभागाने नुकतेच भरतीसाठीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप प्रसिद्ध केले आहे.

जिल्हा परिषद पद भरतीचा अभ्यासक्रम बदलल्याने विद्यार्थ्यांचा संताप  
ZP Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जिल्हा परिषदेच्या (Zilha Parishad) १८ हजार  ९३९ रिक्त जागांच्या भरतीसाठी (ZP Recruitment) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे स्वरूप राज्याच्या ग्रामविकास विभागाने प्रसिद्ध केले आहे. परंतु त्यातील आरोग्य सेवक या पदाच्या अभ्यासक्रमात (ZP exam Syllabus) बदल केल्यामुळे विद्यार्थ्यांकडून (Students) संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गेल्या चार वर्षांपासून केलेल्या अभ्यासावर ग्रामविकास विभागाने पाणी फेरण्याचे काम ग्रामविकास विभागाने केल्याने विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेली चार ते पाच वर्षांपासून जिल्हा परिषदेचे रिक्त पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे. ग्रामविकास विभागाने नुकतेच भरतीसाठीच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप प्रसिद्ध केले आहे. परंतु, त्यात आरोग्य सेवक या पदाच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचा तांत्रिक अभ्यासक्रमच बदलला आहे. त्यामुळे पुढील महिना दोन महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना बदललेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.  

''गेल्या चार, पाच वर्षांपासून आम्ही विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांच्या  भरतीच्या प्रतीक्षेत आहोत. भरती आज होईल उद्या होईल, असे आश्वासन आम्हाला दिले गेले. त्यानुसार आम्ही अभ्यास सुरू ठेवला. परंतु, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवक पदाच्या तांत्रिक अभ्यासक्रमात पूर्ण बदल केल्याने आमचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे पूर्वीच्याच अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी. त्यात बदल करू नये,'' असे बाळकृष्ण ढाकणे या विद्यार्थ्याने सांगितले.

MSBSVET : कौशल्य, व्यवसाय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पद : आरोग्य सेवक, पुरुष (तांत्रिक ) : जुन्या अभ्यासक्रमातील घटक  

अखंड मानवी शरीर,अस्थिसंस्था,स्नायू संस्था, रक्ताभिसरण संस्था, लस संस्था व देण्याच्या पद्धती, मज्जा संस्था, ज्ञानेंद्रिये, श्वसन संस्था, पचन संस्था, मूत्र उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, नलिकाविहीन संस्था, सूक्ष्मजीवशास्त्र आणि निर्जंतुकीकरण, जैविक सुरक्षा, औषधशास्त्र, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्यासंबंधी मूलभूत तत्वे, भारतातील सार्वजनिक आरोग्य, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, रोग व रोगांचे प्रकार ( आरोग्यशास्त्र ) आहार व पोषणशास्त्र, लोकसंख्या धोरण, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम, आरोग्याशी संबंधित शासकीय योजना, बहुउद्देशीय आरोग्य सेवकांच्या जबाबदाऱ्या.

पद : आरोग्य सेवक, पुरुष (तांत्रिक ) : नवा अभ्यासक्रम 

ग्रॅव्हिटेशन पिरयोडीक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स, केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन्स, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, हिट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, कार्बन कंपाऊंड, स्पेस मिशन लेंसेस, लाइफ प्रोसेसेस, इनव्हॉर्मेंटल मॅनेजमेंट, ॲनिमल क्लासिफिकेशन, इंट्रोडोक्शन ऑफ मायक्रोबायोलॉजी, डिझास्टर मॅनेजमेंट.   

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2