MBA CET 2024 चा निकाल जाहीर 

उमेदवार अधिकृत वेबसाईट वरून त्यांचे  स्कोअर कार्ड अपलोड करू शकतात.

MBA CET 2024 चा निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल (MHT CET Cell) ने  MBA, PGDBM प्रवेशासाठी  घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा (MHT MBA CET 2024) निकाल जाहीर केला आहे. उमेदवार cetcel.mahacet.org या अधिकृत वेबसाईट वरून त्यांचे निकाल तपासू शकतात.राज्यातील विविध व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांमध्ये सीईटीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिले आहेत. 

सीईटी सेलने परीक्षेस बसलेल्या उमेदवारांचा स्कोअर कार्ड प्रसिद्ध केला आहे. उमेदवार अधिकृत वेबसाईट वरून त्यांचे  स्कोअर कार्ड अपलोड करू शकतात. MHT CET सेलने 9 ते 11 मार्च दरम्यान महाराष्ट्र MBA प्रवेश परीक्षा आयोजित केल्या होत्या.  त्यानंतर 1 एप्रिल रोजी तात्पुरती उत्तर की जारी करून उमेदवारांकडून हरकती मागवल्या होत्या. या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर आता निकाल जाहीर करण्यात आला आहे. 

 MBA प्रवेश परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांच्या विविध संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी  CET सेलद्वारे केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया (CAP) सुरू केली जाईल. या माध्यमातून राज्यातील तीनशेहून अधिक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होणार आहे.