गोखले इन्स्टिट्यूट : लोकशाही विरोधात लागले पोस्टर? ; 'ABVP' कडून कारवाईची मागणी

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट येथे मतदान जागृतीसाठी लावलेल्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’ लिहिण्यात आले .

गोखले इन्स्टिट्यूट : लोकशाही विरोधात लागले पोस्टर? ; 'ABVP' कडून कारवाईची मागणी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क  आंतरराष्ट्रीयीकरण 

पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट (Gokhale Institute) येथे मतदान जागृतीसाठी लावलेल्या फलकावर ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘नोटा’ (Inqlab Zindabad Nota) लिहिण्यात आले. मात्र, सध्या निवडणूक आयोग (Election Commission) आणि अन्य संस्था जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी जागरूकता निर्माण करत आहे. परंतु, सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या पुण्यात नोटा या पर्यायाची प्रसिद्धी करणारे लिखीत पोस्टर सध्या माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आंदोलन करत गोखले इन्स्टिट्यूट प्रशासनाचा निषेध करून कारवाई करण्याची मागणी केली. 

गोखले इन्स्टिट्यूट पुणे येथील अकॅडमी इमारतीमध्ये नोटा या पर्यायाची प्रसिद्धी करणारे पोस्टर आढळून आले. यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने तत्काळ कारवाई करण्याची मागणी करत गोखले इन्स्टिट्यूटच्या प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. 'अभिविपी'ने गोखले इन्स्टिट्यूट मधील डाव्या  विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून हे कृत्य केले असल्याचा आरोप केला आहे. 

विद्यार्थ्यांनी लोकशाही व पूरक मतदान करावे यासाठी मजकूर लिहिण्यासाठी जागा होती. गोखले इन्स्टिट्यूट मधील काही विद्यार्थ्यांनी नोटा हाच कसा उत्तम पर्याय आहे. या प्रकारचा मजकूर लिहिला. आयोगाच्या नियमावलीनुसार नोटा या पर्यायाची जनजागृती कोणीही करू शकत नाही. संबंधित पोस्टरवर निवडणूक आयोग व गोखले इन्स्टिट्यूटचा लोगो असून सुद्धा कोणतीही कारवाई कुठल्याही प्रशासनाकडून केली गेली नसल्याचा आरोप ABVP कडून करण्यात आला आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या दोषी विद्यार्थ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी इन्स्टिट्यूटबाहेर निदर्शने केली. त्याचबरोबर प्रशासन दोषी विद्यार्थ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. तसेच पोलीस स्टेशन व निवडणूक आयोगामध्ये गोखले इन्स्टिट्यूट प्रशासनावर कारवाई व्हावी याकरिता निवेदन देण्यात आले.