MBA काॅलेज रँकिंग! टाॅप १० मध्ये महाराष्ट्रातील 'या' दोन संस्थांचा समावेश; IIRF ने  जाहीर केली यादी  

IIM मुंबई (पूर्वी NITIE, मुंबई) ७१.९९ गुणांसह ७ व्या तर आयआयएम बॉम्बे ६८.११ गुणांसहित १० व्या क्रमांकावर

MBA काॅलेज रँकिंग! टाॅप १० मध्ये महाराष्ट्रातील 'या' दोन संस्थांचा समावेश; IIRF ने  जाहीर केली यादी  

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

इंडियन इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (IIRF) ने भारतातील सर्वोत्कृष्ट MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन कॉलेजची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये टाॅप १० मध्ये महाराष्ट्रातील दोन संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये IIM मुंबई (पूर्वी NITIE, मुंबई) ७१.९९ गुणांसह ७ व्या तर आयआयएम बॉम्बे ६८.११ गुणांसहित १० व्या क्रमांकावर आहे. शिवाय या यादीत आयआयएम अहमदाबादला अव्वल स्थान मिळाले आहे. तर पहिल्या १०० मध्ये राज्यातील ९ संस्थांचा समावेश आहे. 

हेही वाचा : मोठी बातमी : पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीच्या जाहिराती झाल्या प्रसिद्ध

पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस   मॅनेजमेंट ६२.७४ गुणांनी १७ व्या क्रमांकावर आहे. खाजगी संस्थाच्या यादीत सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट चौथ्या क्रमांकावर आहे. तर राज्यातील एस.पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च ६०.९१  गुणांनी २० व्या क्रमांकावर आहे. तसेच मुंबई  SVKM नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ६०.८४ गुणांनी २१ व्या क्रमांकावर आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूर, KG सोमय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च, प्रिन्सिपल IN वेळानगिकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट आणि नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ बँक मॅनेजमेंट, पुणे या संस्था अनुक्रमे ४३, ४५, ७३ आणि ७६ क्रमांकावर आहे. 

मॅनेजमेंट स्टडीज फॅकल्टी दिल्ली विद्यापीठ, IIIM कलकत्ता, IIIM  बंगलोर, IIIM  कोझिकोड या संस्था यादीत अनुक्रमे २,३,४ आणि पाचव्या स्थानावर आहेत. IIRF ने एकूण ३०० व्यवस्थापन संस्थांचे परीक्षण केले आणि त्यांना स्थान दिले. यामध्ये ५० सरकारी आणि १६० खाजगी संस्थांचा समावेश आहे.