एम.एचएमसीटी व एम. आर्च सीईटी प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर 

उमेदवारांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देवून आपला निकाल पाहता येणार आहे.

एम.एचएमसीटी व एम. आर्च सीईटी प्रवेश परीक्षांचे निकाल जाहीर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (State Common Entrance Test cell) घेण्यात येणाऱ्या महा-एम.एचएमसीटी सीईटी व महा-एम.आर्च  सीईटी (M.HMCT CET and Maha-M.Arch CET) या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल घोषित (Result announced) करण्यात आला आहे. उमेदवारांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळाला भेट देवून आपला निकाल पाहता येणार आहे. उमेदवाराची गुणपत्रिका (Score Card) त्याच्या लाॅगीन मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहित सीईची सेलने प्रसिध्दी केलेल्या पत्रकात नमूद केली आहे. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या महा-एम.एचएमसीटी २०२४ व महा-एम.आर्च  सीईटी २०२४ या सामाईक प्रवेश परीक्षेचा निकाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.  मागील महिन्यात ११ मार्च रोजी या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. आता एक-एका परीक्षांचे निकला हाती येत असून, मागील आठवड्यात B.Ed / M.Ed / B.P.Ed / M.P.Ed या परीक्षांचे निकाल लागले आहेत. 

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये एम.एचएमसीटी व महा-एम.आर्च या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षांचा निकाल जाहीर झालेला आहे. आता प्रवेश परीक्षांचे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होत आहेत. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावरून गुणपत्रिका प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाची प्रतीक्षा उमेदवारांना लागली आहे. 

निकाल कसा तपासावा?

निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम cetcell.mahacet.org  या अधिकृत संकेतस्थळावर जा. संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील पोर्टल लिंकवर क्लिक करा. यानंतर चेक एमएचटी सीईटी निकाल 202४ च्या लिंकवर जा. पुढच्या पानावर रजिस्ट्रेशन नंबरने लॉगिन करा. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्या.