देशभरातील कवी पुण्यात ; बालगंधर्वमध्ये रंगणार काव्य संमेलन

येत्या 3 जानेवारी रोजी बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रीय काव्य संमेलनाचे आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील नामामकीत कवींच्या कविता एकण्याची संधी पुणेकर काव्य रसिकांना मिळणार आहे.

देशभरातील कवी पुण्यात ; बालगंधर्वमध्ये रंगणार काव्य संमेलन

 एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University)अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असून त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत.त्याचाच एक भाग म्हणून येत्या 3 जानेवारी रोजी बालगंधर्व (Balgandharva) रंगमंदिरात राष्ट्रीय काव्य संमेलनाचे आयोजित केले जाणार आहे.त्यामुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील नामामकीत कवींच्या कविता एकण्याची संधी पुणेकर काव्य रसिकांना मिळणार आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सव समितीची बैठक नुकतीच पार पडली.त्यात पुढील काळात आयोजित केल्या जाणा-या विविध कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत चर्चा झाली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे याबाबतचा पत्रव्यवहार केला जात आहे.त्याचाप्रमाणे देशातील दोन मातब्बर राजकीय व्यक्ती आणि इस्त्रोचे प्रमुख यांची व्याखाने आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले.तसेच विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने पोस्टाचे तिकीट काढले जावे, यासाठी सुध्दा प्रयत्न केले जात आहेत.त्यामुळे पुढील काळात विद्यापीठातर्फे विविध रंगी कार्यक्रम व उपक्रम पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा : NSS च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी...

विद्यापीठाच्या अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष राजेंद्र विखे पाटील म्हणाले,विद्यापीठातर्फे अमृत महोत्सवनिमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.येत्या ३ जानेवारी रोजी बालगंधर्व येथे राष्ट्रीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे.याबाबत विद्यापीठाच्या अमृत महोत्सव समितीमध्ये चर्चा करण्यात आली.देशभरातील नामांकित कवींना या काव्य संमेलनासाठी निमंत्रित केले जाणार आहे. 
------------------------