‘पीईएस’मध्ये व्यापारीकरणाचा शिरकाव नाही : डॉ. गजानन एकबोटे

संस्थेचा ८९ वा वर्धानपनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतित यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेवर शुभेच्छांचा वर्षाव केला.

‘पीईएस’मध्ये व्यापारीकरणाचा शिरकाव नाही : डॉ. गजानन एकबोटे
Progressive Education Society celebrates its anniversary

एज्युवार्ता न्युज नेटवर्क

"व्यापारीकरणाचा अजिबात शिरकाव न झाल्याने गुणवत्ता आणि शासकीय नियम यांचे काटेकोर पालन करत ज्ञानदानाचा यज्ञ अखंड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी (Progressive Education Society) ही संस्था  चालवत आहे. गेले ८९ वर्ष ही संस्था अव्याहतपणे ज्ञानदानाचे काम करत आहे, अशी भावना संस्थेचे कार्यवाह डॉ. गजानन एकबोटे (Dr. Gajanan Ekbote) यांनी वर्धापनदिनानिमित्त व्यक्त केली. (Progressive Education Society celebrates its anniversary)

संस्थेचा ८९ वा वर्धानपनदिन शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शैक्षणिक क्षेत्रासह राजकीय, सामाजिक, सांस्कृतित यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संस्थेवर शुभेच्छांचा वर्षाव केला. यावेळी डॉ. एकबोटे यांच्यासह सहकार्यवाह डॉ. जोत्स्ना एकबोटे, सहकार्यवाह प्रा. सुरेश तोडकर, उपकार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे, सचिव प्रा. शामकांत देशमुख, संस्थेच्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

शिक्षकांनी पाया भरलेल्या या संस्थेची धुरा शिक्षकांनीच समर्थपणे संभाळल्याने या कार्याचे पावित्र्य संस्थेने राखलेले आहे. जुन्या नव्याचा संगम या संस्थेत पहायला मिळतो. नवीन शैक्षणिक धोरणातील बदल व नवीन वाटा संस्थेने आत्मसात केलेल्या आहेत. नवनवीन अभ्यासक्रम आणि अद्ययावत शिक्षण देण्यास संस्था सदैव बांधील राहील, अशी भावनाही डॉ. एकबोटे यांनी व्यक्त केली.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी वेगवेगळ्या शैक्षणिक स्तरावर काम करत असुन आज संस्थेअंतर्गत ६२  विविध युनिट्स ज्ञानदानाचे काम करत आहेत. एकुण ६५ हजार विद्यार्थी आहेत. कला, क्रीडा, शिक्षण, संशोधन, राजकारण अशा सर्वच क्षेत्रामध्ये सोसायटीचे विद्यार्थी प्रगती करत असुन निरनिराळ्या देशात सर्व स्तरावर ते योगदान देत आहेत.  सर्वच बाबतीत आज संस्था आघाडीवर असल्याचे प्रा. देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजीराव कदम, युजीसीचे माजी उपाध्यक्ष डॉ. भुषण पटवर्धन, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, डॉ. बाबा आढाव, एस. के. जैन, माजी नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे, बागेश्री मंठाळकर, प्रदीप देशमुख, गौरव बापट, विजय तडवळकर, बाळासाहेब बोडके, रवी शिंगणापुर, भाऊसाहेब जाधव, डॉ. विजय खरे, डॉ.महेश आभाळे, डॉ. सुधाकर जाधवर, डॉ. पराग संचेती, राजेश पांडे यांच्यासह अनेकांनी संस्थेला शुभेच्छा दिल्या.