वा ! भारीच...एकट्या कोकणात 15 दिवसात शिक्षकांच्या 6 हजार जागा भरणार

एकट्या कोकण विभागात सहा हजारांपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार असून त्यात पालघर मधील तब्बल दीड हजार जागांचा समावेश आहे.

 वा ! भारीच...एकट्या कोकणात 15 दिवसात शिक्षकांच्या 6 हजार जागा भरणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यात अनेक पात्र उमेदवारामध्ये शिक्षक भरतीबाबत (Teacher Recruitment) उत्सुकता आहे. त्यातच राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (School Education Minister Deepak Kesarkar) यांनी येत्या १५ दिवसात पवित्र पोर्टलच्या (Pavitra Portal) माध्यमातून शिक्षक भरती सुरू केली जाणार असल्याची माहिती विधान परिषदेत दिली आहे. त्यामुळे लवकरच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.परंतु, कोणत्या जिल्ह्यात किती जागा भरल्या जाणार याबाबत उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता आहे. शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकट्या कोकण विभागात (Konkan Division) सहा हजारांपेक्षा जास्त जागा भरल्या जाणार असून त्यात पालघर मधील तब्बल दीड हजार जागांचा समावेश आहे.

राज्याच्या शिक्षण विभागातर्फे पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या सुमारे ३० हजार जागा भरण्याचा प्रयत्न आहे.त्यादृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू आहे.त्यामुळे आणखी काही दिवसांसाठी ही भरती लांबली आहे.लवकरच जिल्हा निहाय शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.प्रथमत:जिल्हा परिषदेतील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.त्यासाठी रोष्टर तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.त्यात एखट्या पालघर जिल्ह्यात दीड हजारापेक्षा जास्त जागा शिल्लक आहेत. तर सिंद्धूदूर्ग जिल्ह्यात सुमारे एक हजार जागा ,रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे १ हजार २०० , रायगड जिल्ह्यात दीड हजार जागापेक्षा जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे कोकणातील शिक्षक भरतीचा मोठा बॅकलॉक भरला जाणार आहे. 

हेही वाचा : PWD JE TCS paper leak : आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंता परीक्षेचा पेपर फुटला ?

शिक्षक भरतीसाठी पात्र असणारे उमेदवार जाहिरात केव्हा प्रसिद्ध होणार या प्रतीक्षेत आहे.त्यामुळे कोकणात शिक्षकाची नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांना मोठी संधी आहे.केवळ कोकणातीलच नाही तर इतर जिल्ह्यातील उमेदवार सुध्दा कोकणात नोकरीसाठी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्या तब्बल सहा हजारापेक्षा जास्त जागा रिक्त दिसत असल्या तरी अंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. 

-------------------------------------