JEE मुख्य पेपर 2 ची अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध 

अंतिम Answer Key विरुद्ध कोणत्याही प्रकारची हरकत/तक्रार नोंदवता येणार नाही.

JEE मुख्य पेपर 2 ची अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने आज म्हणजेच 5 मार्च 2024 रोजी JEE मुख्य पेपर 2 चे अंतिम उत्तर सूची (Answer Key) प्रसिध्द केली आहे. उमेदवार jeemain.nta.ac.in ला भेट देऊन अन्सर की डाउनलोड करू शकतात. अंतिम अन्सर की  पीडीएफ स्वरूपात जारी करण्यात आली आहे. याद्वारे उमेदवार आपल्या निकालाचा अंदाज लावू शकतात. 
ही अन्सर की अंतिम आणि सर्वत्र स्वीकृत आहे. अंतिम Answer Key विरुद्ध कोणत्याही प्रकारची हरकत/तक्रार नोंदवता येणार नाही. उमेदवारांचा निकाल अंतिम अन्सर की नुसार घोषित केला जाईल, असे NTA कडून सांगण्यात आले आहे.

अंतिम अन्सर की जाहीर झाल्यानंतर  बी.आर्क आणि बी-प्लॅनिंग (पेपर 2) चा निकाल केव्हाही जाहीर होणे अपेक्षित आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार लॉगिन क्रेडेन्शियल्स टाकून निकाल तपासण्यास सक्षम असतील. 

अंतिम अन्सर की याप्रमाणे डाउनलोड करा 

* JEE मुख्य पेपर 2 अंतिम Answer Key डाउनलोड करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.ac.in ला भेट द्या.
* वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, JEE (मुख्य) - 2024 : सत्र - 1 B.Arch / B.Planning ची अंतिम उत्तर की या लिंकवर क्लिक करा.
* आता अंतिम Answer Key स्क्रीनवर उघडेल.
* आता तुम्ही ते डाउनलोड आणि सेव्ह करू शकता.