पीएच.डी. प्रवेशात 10 टक्के मराठा आरक्षण ; विद्यापीठाची प्रक्रिया सुरू

विद्यापीठाची पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा येत्या मे महिन्यात होऊ शकते,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

पीएच.डी. प्रवेशात 10 टक्के मराठा आरक्षण ; विद्यापीठाची प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया (Savitribai Phule Pune University Ph.D Admission Process)सुरू करण्यापूर्वी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अंमलबजावणीच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना पीएच.डी.(PHD)प्रवेशासाठी (Students admitted to Ph.D)आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे.एप्रिल महिन्यात युपीएससीसह विवध प्रवेश पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत.त्यामुळे विद्यापीठाची पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा (Ph.D. Pre-Admission Examination of the University- PET ) येत्या मे महिन्यात होऊ शकते,असे विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या संशोधन केंद्रात पीएच.डी.साठी प्रवेश मिळावा यांची प्रतीक्षा केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थी करत आहेत.मात्र,ऑनलाईन परीक्षेसाठी न मिळणे, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी आदी कारणांमुळे पीएच.डी.प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास काहीसा उशीर होत आहे.राज्य शासनाने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.तसेच त्यासंदर्भातील अध्यादेशाही प्रसिद्ध केला.26 फेब्रुवारीपासून या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.त्यामुळे विद्यापीठाने पीएच.डी.प्रवेशासाठी केंद्रनिहाय आरक्षण देण्यासाठीची तयारी सुरू केली आहे.लवकरच त्याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. 

विद्यापीठाची पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया केव्हा सुरू होणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.मात्र,मार्गदर्शक आणि संशोधन केंद्रांवर उपलब्ध असणाऱ्या जागा आणि मराठी समाजातील विद्यार्थ्यांना देण्यात आलेले 10 टक्के आरक्षण याबाबतची अंतर्गत प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच पीएच.डी. प्रवेश सुरू केले जाणार आहेत.त्यातही एप्रिल महिन्यात ऑनालाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्र उपलब्ध नाहीत.तसेच लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखा आणि पीएच.डी. परीक्षा एकाच दिवशी येणार नाही, यांची विद्यापीठाला काळजी घ्यावी लागणार आहे.त्यामुळे येत्या आठवड्याभारनंतर यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल,असेही विद्यापीठातील अधिकाऱ्यांकडून सांगत आहे. 
-----------------------------------------

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेश प्रक्रियेमध्ये मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.विद्यापीठातर्फे लवकरच याबाबतचे पत्रक प्रसिद्ध केले जाईल. तसेच ऑनलाईन परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या उपलब्ध तारखा विचारात घेऊन पीएच.डी. प्रवेशाचे वेळापत्रक प्रसिध्द केले जाईल.

- डॉ. पराग काळकर, प्र- कुलगुरू , सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे