तरुणांनो, भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायू’ होण्याची संधी; भरती प्रक्रिया २७ जुलै पासून

अग्निवीरवायू पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा १३ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

तरुणांनो, भारतीय हवाई दलात ‘अग्निवीरवायू’ होण्याची संधी; भरती प्रक्रिया २७ जुलै पासून
Agniveervayu Recruitment

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

IAF अग्निवीरवायू भरती २०२४ : भारतीय वायु दलाने (Indian Air Force) काही दिवसांपूर्वीच अग्निपथ (Agnipath) योजनेअंतर्गत अग्निवीरवायू (Agniveervayu) पदांची भरती होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार या भरतीसाठी (Recruitment) ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया २७ जुलै पासून सुरू होणार असून इच्छूकांना १७ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येतील. या प्रक्रियेनंतर परीक्षा घेतली जाणार आहे.

अग्निवीरवायू पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा १३ ऑक्टोबर रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार विज्ञान शाखेतून किमान ५० टक्के गुणांनी १२ वी उत्तीर्ण झालेले असावेत. तसेच इंग्रजी या विषयातही त्यांना किमान ५० टक्के गुण बंधनकारक आहे. १२वी उत्तीर्ण किंवा विज्ञानाव्यतिरिक्त इतर विषयांचे समतुल्य शिक्षण घेतलेले  उमेदवार देखील या पदासाठी  अर्ज करू शकतात. 

MPSC : तीन महिन्यांत केवळ हजार पदांची शिफारस अन् शासनाकडून ८५४ पदांसाठी मागणीपत्र

याशिवाय मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमधून मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाईल/ कॉम्प्युटर सायन्स/ इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ माहिती तंत्रज्ञान या विषयात अभियांत्रिकी पदविका असलेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात.

उमेदवाराला अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात किमान ५० टक्के गुण आणि इंग्रजी भाषेत ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. उमेदवाराचे वय २१ वर्षे असावे. उमेदवाराचा जन्म २७ जून २००३ पूर्वी आणि २७ डिसेंबर २००६ नंतर झालेला नसावा, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. 

तलाठी भरती : अर्जात दुरुस्तीची संधी नाकारली ; विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती

असा करा अर्ज -

  * agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

   * वेबसाइटच्या होमपेजवर भरती नोकरीच्या संबंधित विभागावर क्लिक करा.

   * अग्निवीरवायु अर्ज फॉर्म लिंक सक्रिय होताच तुम्हाला दिसेल.

   * उमेदवार लिंकवर क्लिक करा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

   * अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती प्रविष्ट करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.       

  * अर्ज प्रक्रिया पूर्ण करून अर्ज फी भरा.

    * अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढा.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD