ISRO Mission : चंद्र, सूर्य आणि मंगळ ग्रहानंतर आता नजर शुक्रावर

सध्या ISRO मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयानच्या दिशेने पावले टाकत, पहिल्या चाचणी वाहन विकास उड्डाण (टीव्ही-डी1) चाचणी टप्प्यात शनिवारी (दि. २१ ऑक्टोबर) रोजी होणार आहे.

ISRO Mission : चंद्र, सूर्य आणि मंगळ ग्रहानंतर आता नजर शुक्रावर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

चंद्रयान-3 (Chandrayaan-3) आणि नंतर सूर्य मिशन आदित्य-L1 (Aditya L-1) या यशस्वी मिशन नंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) पुढील दोन वर्षातील मिशन प्लॅन तयार केले असून त्यावर काम सुरु आहे. यातील महत्वपूर्ण मिशन म्हणजे शुक्रयान. याशिवाय अमेरिकेतील नासा (NASA) आणि जपान च्या सहाय्यानेही  काही मोहिमा राबविल्या जाणार आहेत. 

 

सध्या ISRO मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयानच्या दिशेने पावले टाकत, पहिल्या चाचणी वाहन विकास उड्डाण (टीव्ही-डी1) चाचणी टप्प्यात शनिवारी (दि. २१ ऑक्टोबर) रोजी होणार आहे. या दिवशी गगनयान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित केले जाईल. TV-D1 चे हे प्रक्षेपण सध्या मानवरहित असेल जे गगनयान मिशन २०२४ च्या दिशेने पहिले पाऊल आहे.

Apna Chandrayaan : खास शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाने आणले ‘अपना चंद्रयान’

 

पुढील वर्षी गगनयान २ मोहीमही सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय २०२४ मध्ये ISRO चे महत्वपूर्ण मिशन असणार आहे ते म्हणजे शुक्रयान. इस्रोचे हे मिशन शुक्राच्या कक्षेत अंतराळयान पाठवणे आहे. भारताचे व्हीनस मिशन ऑर्बिटर मिशन असेल. याचा अर्थ हे यान  शुक्र ग्रहाभोवती प्रदक्षिणा घालताना अभ्यास करेल. यामध्ये  अनेक वैज्ञानिक पेलोड असतील. पण त्यात बसवलेले हाय रिझोल्युशन सिंथेटिक अपर्चर रडार आणि ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार हे सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे.

 

स्पेस एजन्सी इस्रो व्हीनसच्या माध्यमातून व्हीनसची भौगोलिक रचना आणि ज्वालामुखीच्या क्रियाकलापांचा अभ्यास करेल. यासोबतच शुक्र जमिनीवरील वायू उत्सर्जन, वाऱ्याचा वेग, ढग आणि इतर गोष्टींचा अभ्यास करेल. हे यान शुक्र ग्रहाभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरेल. NASA-ISRO सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) ही यूएस स्पेस एजन्सी NASA आणि ISRO यांची संयुक्त मोहीम आहे. याद्वारे, रिमोट सेन्सिंगसाठी ड्युअल-फ्रिक्वेंसी सिंथेटिक ऍपर्चर रडार उपग्रह प्रक्षेपित केला जाईल. ही मोहीम २०२४ मध्ये राबविली जाणार आहे. 

 

चांद्रयान ४ ही मोहीम चांद्रयान-३ चा पुढचा टप्पा आहे आणि त्याला 'लुनर पोलर एक्सप्लोरेशन मिशन'  (LUPEX) असे नाव देण्यात आले आहे. ISRO ही मोहीम जपान स्पेस एजन्सी (JAXA) च्या सहकार्याने प्रक्षेपित करणार आहे. याशिवाय याच वर्षी मंगळयान २ ही मोहीम हि राबवण्यात येणार आहे. २०२५ मध्ये गगनयान-३ या मानवयुक्त अंतराळ मोहिमेअंतर्गत, इस्रो २०२५ मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अंतराळ यानाच्या आधारे गगनयान-३ प्रक्षेपित करेल.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k