प्राथमिक शाळेत इंग्रजीसह इतर परदेशी भाषा शिकविण्यास बंदी; ‘या’ देशाचा अजब निर्णय

इराणने बालवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी आणि अरबीसह सर्व परदेशी भाषा शिकविण्यास बंदी घातली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये इराणने  पूर्व प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी शिकवण्यावर बंदी घातली होती

प्राथमिक शाळेत इंग्रजीसह इतर परदेशी भाषा शिकविण्यास बंदी; ‘या’ देशाचा अजब निर्णय

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर किमान इंग्रजी (English) भाषा यायलाच हवी, आणि इंग्रजी सहित इतरही परदेशी भाषा (Foreign Language) अवगत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे भविष्य नक्की उज्वल असेल, असा विश्वास भारतासहित जगातील इतर देशमध्येही दिसतो. त्यामुळे सगळीकडे अनेक भाषा शिकवण्यावर भर दिला जातो. पण इराण सरकारने (Iran Government) एक अजब फर्मान काढले आहे. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळेत (Primary School) यापुढे इंग्रजी, अरेबिक सहित इतर परदेशी भाषा शिकविण्यावर  बंदी घाiलण्यात आली आहे. 

 

इराणने बालवाडी आणि प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी आणि अरबीसह सर्व परदेशी भाषा शिकविण्यास बंदी घातली आहे. यापूर्वी २०१८ मध्ये इराणने  पूर्व प्राथमिक शाळांमध्ये इंग्रजी शिकवण्यावर बंदी घातली होती, प्राथमिक शाळेतही या भाषांवर बंदी घालण्यात आली आहे. आता फक्त  माध्यमिक शाळांमधून परदेशी भाषा  शिकवली जाणार आहे. 

Apna Chandrayaan : खास शालेय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंत्रालयाने आणले ‘अपना चंद्रयान’

 

इराणच्या शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी मसूद तेहरानी-फरजाद यांनी सांगितले की, बालवाडी, नर्सरी शाळा आणि प्राथमिक शाळांमध्ये परदेशी भाषा शिकवण्यास मनाई आहे कारण या वयात मुलांची  इराणी ओळख तयार होत असते. त्यामुळे त्यांना इराणची  अधिकृत भाषा पर्शियन व्यवस्थित अवगत होणे आवश्यक आहे. फारसी ही इराणची एकमेव अधिकृत भाषा आहे.

 

जून २०२२ मध्ये, इराणच्या शिक्षण मंत्रालयाने इंग्रजी भाषेची मक्तेदारी संपवण्यासाठी देशभरातील शाळांमध्ये "फ्रेंच शिकवण्याची चाचणी" सुरू करण्याची योजना मांडली. सप्टेंबरमध्ये देशाने इराणी किंवा दुहेरी राष्ट्रीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये जाण्यावर बंदी घातली, असे म्हटले की मुलांनी देशाच्या शालेय अभ्यासक्रमाचे पालन करणे बंधनकारक आहे. या निर्णयामुळे फ्रेंच आणि जर्मन संस्थांसह तेहरानमधील काही आंतरराष्ट्रीय शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत अचानक घट झाली होती.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/GXLBZGdPxQ7FzGBg6RD26k