मॉडेलिंगमध्ये फक्त सुंदर चेहरा पुरेसा नाही! करिअरसाठी हे कोर्स महत्वाचे...   

सर्वसामान्यपणे समाजात असा समज आहे की,  सुंदर चेहरा आणि चांगली पर्सनॅलिटी या दोन गोष्टी मॉडेलिंग क्षेत्रासाठी पुरेशा आहेत. पण प्रत्यक्षात असे नाही.

मॉडेलिंगमध्ये फक्त सुंदर चेहरा पुरेसा नाही! करिअरसाठी हे कोर्स महत्वाचे...   
Career in Modeling

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

लहान-मोठे सर्वांनाच आकर्षण वाटणारे, एखाद्याला आवडो अगर न आवडो पण नजरेआड न करता येण्यासारखे प्रोफेशन म्हणजे मॉडेलिंग (Modeling). सध्या जाहिराती, टीव्ही, चित्रपट, एखाद्या वस्तूचे  ब्रॅण्डिंग (Branding) असे काहीही असले तरी मॉडेलिंग आणि मॉडेल्स हा अविभाज्य घटक बनला आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर (Career in Modeling) करण्यासाठी शैक्षणिक पात्रता (Educational Criteria) कोणत्या हव्यात, व्यावसायिक कौशल्य, कोर्सेस (Vocational Courses) यासर्वांची माहिती मिसेस इंडिया वर्ल्ड (MRs. India World 2018) आणि फॅशन कोरिओग्राफर उर्मी ज्योत्स्ना वासानी (Urmi Jyotsna Vasani) यांनी ' एज्युवार्ता ' शी बोलताना दिली. 

मॉडेलिंग हे एक ग्लॅमरस फिल्ड असल्याचे सांगत उर्मी म्हणाल्या, सर्वसामान्यपणे समाजात असा समज आहे की,  सुंदर चेहरा आणि चांगली पर्सनॅलिटी या दोन गोष्टी मॉडेलिंग क्षेत्रासाठी पुरेशा आहेत. पण प्रत्यक्षात असे नाही. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी औपचारिक शिक्षणाचीही गरज असते. यामध्ये डिप्लोमा तसेच पदवी अभ्यासक्रमाचाही समावेश आहे.

फॅशन इंडस्ट्रीचे आकर्षण असेल तर मग करिअरच करा! अनेक संधी अन् पैसाही...

उर्मी यांनी सांगितले की, "मॉडेलिंग क्षेत्रात कोणतेही व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम नाहीत. विविध संस्थांद्वारे काही प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रम दिले जात आहेत. विविध प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमांसाठी काही पात्रता निकषही आहेत. ज्या उमेदवारांना मॉडेलिंग कोर्सेस करण्यास स्वारस्य आहे ते अनेक महाविद्यालये आणि संस्थांमध्ये अर्ज करू शकतात.

या अभ्यासक्रमांसाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून  इयत्ता १० वी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांनी बोर्डाच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवलेले असावेत. यासाठी संबंधित संस्थेकडून प्रवेश परीक्षा देखील घेतली जाते, त्यात उत्तीर्ण होणे देखील बंधनकारक असल्याचे उर्मी यांनी स्पष्ट केले.

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/BKV1cdTvHMDAsv3o1G8AB2