DPIIT परीक्षक भरती परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) पेटंट आणि डिझाइन परीक्षक भरती परीक्षेचे (DPIIT) प्रवेश पत्र जारी केले आहे.

DPIIT परीक्षक भरती परीक्षेचे हॉल तिकीट प्रसिद्ध
DPIIT Exam

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) पेटंट आणि डिझाइन परीक्षक भरती परीक्षेचे (DPIIT) हॉल तिकीट प्रसिद्ध केले आहे. DPIIT परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइट Exams.nta.ac.in वर जाऊन त्यांचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

अधिकृत सूचनेनुसार, पेटंट कार्यालयातील DR कोट्यातील 553 रिक्त पदांसाठीची प्राथमिक परीक्षा 21 डिसेंबर रोजी देशभरातील 103 शहरांमध्ये होणार आहे. एकूण 89 हजार, 657 उमेदवार परीक्षेला बसणार आहेत. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात.

ब्रिटनच्या व्हिसा बदलाचे भारतीय विद्यार्थ्यांवर काय होणार परिणाम ?

प्रश्नपत्रिका आणि उत्तर की 26 किंवा 27 डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जातील. प्राथमिक निकाल जानेवारी 2024 च्या पहिल्या आठवड्यात वेबसाइटवर प्रदर्शित केला जाईल. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवार NTA च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

हॉल तिकीट असे करा डाउनलोड

* NTA च्या अधिकृत वेबसाईट Exams.nta.ac.in ला भेट द्या.
* होम पेजवर उपलब्ध NTA DPIIT Examiner Admit Card 2023 लिंकवर क्लिक करा.
* लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट वर क्लिक करा.
* अॅडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
* अॅडमिट कार्ड तपासा आणि पेज डाउनलोड करा, प्रिंटआउट काढा