अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये बदल 

विद्यार्थ्यांना १६ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु ही मुदत आता येत्या २० डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षेच्या तारखांमध्ये बदल 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) अखिल भारतीय सैनिक शाळा (military school) प्रवेश परीक्षा (AISSEE 2024) च्या तारखेत बदल केले आहेत. येत्या २१ जानेवारी रोजी होणार प्रवेश परीक्षा आता येत्या २८ जानेवारी २०२४ रोजी होणार आहे.

 “काही प्रमुख राष्ट्रीय परीक्षा आणि अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE)-2024  एकाच दिवशी म्हणजे  २१ जानेवारी 2024 रोजी होणार होत्या. त्यामुळे  AISSEE-2024 परीक्षा येत्या २८ जानेवारी  पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे,असे एनटीएने आपल्या अधिकृत नोटीसमध्ये नमूद केले आहे.

अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षेची नोंदणीची तारीख देखील वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १६ डिसेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. परंतु ही मुदत आता येत्या २० डिसेंबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

अधिकृत वेळापत्रकानुसार २२  ते २४ डिसेंबर पर्यंत अर्जात दुरूस्ती करता येईल. या कालावधीत उमेदवारांना त्यांच्या परीक्षा अर्जामध्ये सादर केलेल्या कोणत्याही तपशिलांमध्ये दुरुस्त्या करता येतील. अपलोड करताना काही त्रुटी असल्यास ते आधीच अपलोड केलेले दस्तऐवज योग्य दस्तऐवजांसह बदलण्यास सक्षम असतील. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवारांनी AISSEE च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.