युजीसीकडून भारतीय बौद्ध धर्माचा इतिहास, बौद्ध पर्यटन, बौद्ध तत्त्वज्ञानावरील अभ्यासक्रम शिकण्याची संधी

प्रत्येक कोर्ससाठी चार क्रेडिट देण्यात आले आहेत.

युजीसीकडून भारतीय बौद्ध धर्माचा इतिहास, बौद्ध पर्यटन, बौद्ध तत्त्वज्ञानावरील अभ्यासक्रम शिकण्याची संधी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी - UGC) मान्यता दिलेले चार बौद्ध अभ्यासक्रम (Buddhist Curriculum)  येत्या जानेवारी महिन्यापासून ऑनलाइन पद्धतीने शिकण्याची संधी (Opportunity to learn online) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यात भारतीय बौद्ध धर्माचा इतिहास, बौद्ध पर्यटन, बौद्ध तत्त्वज्ञान, (History of Indian Buddhism, Buddhist Tourism, Buddhist Philosophy)अभिधर्म (पाली) यांचा समावेश आहे. या अभ्यासक्रमांना जानेवारी महिन्यात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा मे महिन्यात घेण्यात येणार आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाने याबाबतचे पत्रक सर्व विद्यापीठांना पाठवले असून १५ आठवड्यांच्या या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक कोर्ससाठी चार क्रेडिट देण्यात आले आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर क्रेडिट हस्तांतरित करून विद्यार्थ्यांच्या पदवीशी जोडले जातील. स्वयम व्यासपीठाच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम चालवले जाणार आहेत.

हेही वाचा : जी.जी. इंटरनॅशनल, डी.वाय.पाटील , पी.जोग शाळा बंद ; यु-डायसवरून नावे हटवण्याचे आदेश

भारत हे बौद्ध संस्कृती आणि पर्यटनाचे सर्वात मोठे केंद्र असल्यामुळे या अभ्यासक्रमांना मान्यता दिली गेली आहे. भारतासह इतरही देशांमधील विद्यार्थी या ऑनलाईन अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करू शकतात. बौद्ध संस्कृती आणि पर्यटनाचे जागतिक केंद्र म्हणून भारताला पुनरुजिवित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.