जी.जी. इंटरनॅशनल, डी.वाय.पाटील , पी.जोग शाळा बंद ;  यु-डायसवरून नावे हटवण्याचे आदेश

मागील दोन वर्षांपासून या शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला नाही.

जी.जी. इंटरनॅशनल, डी.वाय.पाटील , पी.जोग शाळा बंद ;  यु-डायसवरून नावे हटवण्याचे आदेश

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अनेक संस्था चालक मोठ्या उत्साहाने इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळा (English and Marathi medium schools)सुरू करतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून या शाळांमध्ये एकही विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला नाही.त्यामुळे या शाळा शून्य पाटाच्या (The school is zero board)असल्याचे शिक्षण विभागाने घोषित केले आहे. आता या शाळांची नावे यु-डायस पोर्टलवरून हटवण्याचे आदेश (Order to remove names of schools from U-DICE portal)देण्यात आले आहेत. या शाळांमध्ये जी.जी. इंटरनॅशनल स्कूल, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल, पी.जोग (G. G.  International, DY Patil, P. Jog School)यासह दौंड तालुक्यातील समाज कल्याण विभागाच्या शाळेचाही समावेश आहे. यातील बहुतांश शाळा या सेल्फ फायनान्स (Self finance school)असून तीन शाळा खासगी अनुदानित आहेत. 

हेही वाचा : शिक्षक भरतीच्या जाहिरातीला २८ डिसेंबरचा मुहूर्त ?

दौंड, हवेली, मुळशी ,शिरूर ,वेल्हे या तालुक्यासह औंध, बिबवेवाडी,  हडपसर, पिंपरी येथे शून्य पटाच्या शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांमध्ये मागील वर्षी आणि या वर्षी  एकाही विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही.त्यामुळे अशा शाळांची नावे यु-डायस पोर्टलवरून काढून टाकावी, असे आदेश पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 दरम्यान, काही शाळांनी अद्याप विद्यार्थ्यांची माहिती भरण्यास सुरूवात केली नाही.त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थी संख्या शून्य दिसत असल्याचे जिल्हा परिषदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

----------

"केंद्र शासनातर्फे यु-डायसवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर संबंधित राज्याची शैक्षणिक गुणवत्ता तपासली जाते. त्यात यु-डायसवर शून्य पटाच्या शाळा दिसत असतील तर आपोआपच राज्याच्या शैक्षणिक मूल्यांकनावर परिणाम होतो. दोन वर्षांपासून या शाळेत विद्यार्थी नाहीत. परिणामी या शाळा बंद आहेत.त्यामुळे या शाळा यू-डायस पोर्टलवरून काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत."
- राजेंद्र अहिरे, पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक 

----------------------------------------------------------

पुणे जिलह्यातील शून्य पटाच्या शाळांची यादी

१) जी.जी. इंटरनॅशनल स्कूल ,मुळशी

२) डी.वाय.पाटील इंटरनॅशनल स्कूल, च-होली, आकुर्डी

३) पी.जोग. स्कूल, बिबवेवाडी

४) कै. पी.बी.जोग हायस्कूल मराठी मिडियम, औंध

५) बाबुराव दामले माध्यमिक विद्यालय, मुळशी

६) हसन हुसैंन इमामिया उर्दू हायस्कूल,  हडपसर

७) गोरा कुंभार हायस्कूल, औंध

८) संकपाळ इंटरनॅशनल स्कूल, हवेली

९) राहुल इंटरनॅशनल स्कूल, मुळशी

१०) पलांडे जुनिअर कॉलेज, शिरूर

११) अमृतेश्वर ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, वेल्हे

१२) महात्मा फुले जुनियर कॉलेज, औंध

१३) गणेश इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी

१३) दी काकस इंटरनॅशनल स्कूल, पिंपरी

१४) विश्व कल्याण इंग्लिश मीडियम

१५)  स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, आकुर्डी

१६) एस.सी. ॲण्ड नवबौद्ध बॉईज रेसिडेन्शियल स्कूल, दौंड

---------------------------