CBSE Board : सीबीएसई 10 वीच्या प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका देणार नाही :  प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली

सीबीएसई बोर्डाने इयत्ता 10 वी आणि 12 वीचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध केले

CBSE Board : सीबीएसई 10 वीच्या प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका देणार नाही :  प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क :  

CBSE Practical Exams : सीबीएसई बोर्डाने इयत्ता 10 वी आणि 12 वीचे वेळापत्रक नुकतेच  प्रसिद्ध केले. वेळापत्रका पाठोपाठ बोर्डाने प्रात्यक्षिक परीक्षांसाठी 10 महत्त्वपूर्ण मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. सीबीएसई 10 वीच्या प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका देणार नाही. शाळांना सर्व व्यवस्था स्वत: करावी लागेल. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका विभागीय कार्यालयात पाठविण्याची गरज नाही, असे  सीबीएसईने मार्गदर्शक तत्वात म्हटले आहे. 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 10 वी, 12 वी प्रात्यक्षिक परीक्षा 2024 साठी मानक कार्यप्रणाली (SOPs) आणि मार्गदर्शक तत्त्वांबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. सर्व प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण परीक्षेच्या तारखांपासून एकाच वेळी अपलोड केले जातील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पोर्टलवरील गुण अपलोड करण्याचे काम संबंधित वर्गाच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या शेवटच्या तारखेपर्यंत पूर्ण केले जाईल. तसेच, गुण अपलोड करताना, शाळा, अंतर्गत परीक्षक यांनी योग्य गुण अपलोड केले आहेत याची खात्री करावी, कारण गुण अपलोड केल्यानंतर गुणांमध्ये कोणतीही सुधारणा केली जाणार नाही, असे निर्देश बोर्डाकडून देण्यात आले आहेत. 

हेही वाचा : NMC च्या दोन बदलावरून वाद ; लोगोमध्ये भगवान धन्वंतरींचा फोटो तर 'इंडिया' चे केले 'भारत'

याशिवाय प्रत्येक शाळेत प्रात्यक्षिक परीक्षा आणि विशिष्ट विषयांच्या प्रकल्प मूल्यमापनासाठी बाह्य परीक्षक मंडळाकडून नियुक्त केले जातील, स्थानिक पातळीवर बाह्य परीक्षकांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याची शाळांना परवानगी नाही. बाह्य परीक्षकांची नियुक्ती फक्त मंडळाकडून केली जाईल, असे मार्गदर्शक तत्वात नमूद करण्यात आले आहे. 10 वी, 12 वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सर्व शाळांद्वारे 1 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेतल्या जातील.