New Education Board : देशपातळीवर आणखी एका बोर्डाची भर : रामदेवबाबांच्या भारतीय शिक्षण मंडळाला मान्यता 

देशपातळीवर शिक्षण मंडळामध्ये आणखी एका मंडळाची भर पडली आहे.

New Education Board : देशपातळीवर आणखी एका बोर्डाची भर : रामदेवबाबांच्या भारतीय शिक्षण मंडळाला मान्यता 
Board of Indian Education

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क : 

Board Of Education Of India : देशपातळीवर शिक्षण मंडळामध्ये आणखी एका मंडळाची भर पडली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) धर्तीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने भारतीय शिक्षण मंडळ या संस्थेला देशव्यापी मान्यता दिली. हरिद्वार स्थित ही संस्था योगगुरू रामदेव बाबा यांची आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी) व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) यांनी या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध केले. देशभरात राज्य सरकारच्या अखत्यारितील शिक्षण मंडळे आणि राष्ट्रीय मुक्त शिक्षण मंडळ तसेच सीबीएसई, सीआयसीएसई अशा शिक्षण मंडळांशिवाय आता भारतीय शिक्षण मंडळ या शिक्षण मंडळाची भर पडली आहे. 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून हरिद्वार येथील भारतीय शिक्षण मंडळाला राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण मंडळांमध्ये समावेश केला असल्याचे पत्राद्वारे कळवले असल्याचे, यूजीसी आणि एआयसीटीईच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तर भारतीय विद्यापीठ महासंघाने (एआययू) शिक्षण मंडळाला ऑगस्ट 2022 मध्ये देशभरातील शिक्षण मंडळांसह समकक्षता दिली. देशातील नियमित शिक्षण मंडळ म्हणून मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा समकक्ष ठरवल्या आहे. त्यामुळे भारतीय शिक्षण मंडळाला देशव्यापी शिक्षण मंडळ म्हणून ग्राह्य धरावे, असेही एआयसीटीईने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : CBSE Board : सीबीएसई 10 वीच्या प्रात्यक्षिक उत्तरपत्रिका देणार नाही : प्रात्यक्षिक परीक्षांसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली

भारतीय शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार शिक्षण मंत्रालयाने शिक्षण मंडळाला राष्ट्रीय मंडळ म्हणून फेब्रुवारी 2023 मध्येच मान्यता दिली आहे. तसेच भारतीय शिक्षण मंडळाला देशातील शिक्षण मंडळांच्या परिषदेचे (सीओबीएसई) सदस्यत्व जानेवारी 2023 मध्ये देण्यात आले आहे. तर अखिल भारतीय विद्यापीठ महासंघातर्फे (एआययू) भारतीय शिक्षण मंडळाला अन्य राष्ट्रीय, राज्य मंडळांप्रमाणे समकक्षता देण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.